लोकं निघाले दुचाकी गाडीने आज झोडपून काढलंय गारीने
मेघगर्जना व गारीपिठ सह मुसळधार पावसाने लावली हजेरी
चामोर्शी, सुखसागर झाडे
चामोर्शी सह भेंडाळा परिसरातील भागात आज अचानक ३ वाजेच्या सुमारास अवकाशात ढगांची निर्मिती होत मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा सुटला व अचानक गारपीट झाल्याने विविध कामानिमित्त घरा बाहेर पडलेल्या लोकांना गारीने झोडपून काढले.
शाळेची सुट्टी आणि निसर्गाचा कोप याची वेळ सुद्धा तंतोतंत जुळल्याने शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा या परिस्थितीचा सामना तसेच नाहक त्रास सहन करावा लागला.
अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या टॅक्टर व यंत्राच्या सहाय्याने धान मळणीची कामे सर्वत्र जोमाने सुरू आहेत. काही शेतकऱ्यांची धान्य शेतातच काढले आहेत, तर बऱ्याच शेतकऱ्यांची पुंजणे जैसे थे आहेत.अशा अचानक होणाऱ्या अवकाळी मुसळधार पावसाने धानाच्या ढिगाऱ्यात (पुंजण्यात) पाणी घुसून मोठे नुकसान होण्याची संभावना नाकारता येत नाही. शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेण्यास कोपला असल्याचे चित्र दिसून येत असल्याने सर्वत्र खंमग चर्चेचा उत दिसून येत आहे. शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.