सास्ती येथील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा

0
584

सास्ती येथील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करा

उलगुलान संघटना शाखा सास्ती च्या वतीने कनिष्ठ अभियंता यांना निवेदन देऊन केली मागणी

मागील अंदाजे पाच ते सहा महिन्यापासुन सास्ती गावातील विज पुरवठा वारंवार रात्रभर तर कधीकधी संपूर्ण दिवसभर कोणतेही कारण नसताना खंडित होत असतो. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करतांना अडचणीला समोर जावे लागत असून, सतत आठ ते बारा तास विज खंडित असने हे नित्याचेच झाले असुन सदर प्रकारामुळे गावकऱ्यांना नाहक त्रासाला सामोर जावे लागत आहे. लाकडाऊन मुळे व्यापारी, व्यवसायिक वर्ग शेतकरी व सर्वसामान्य नागरिक पुर्वीच त्रस्त असतांना विज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गावकरी व व्यापारी वर्गात प्रचंड प्रमाणात रोष आहे. सास्ती येथे नियुक्त लाईनमॅन मुख्यालयी न राहता बाहेरून ये जा करीत असुन ड्युटीवर असतांना सतत दारूच्या नशेत असतो असे निदर्शनास आले आहे.
तरी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन विज पुरवठा सुरळीत चालू राहील याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अन्यथा विज वितरण कंपनी प्रशासना विरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा उलगुलान संघटनेच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देताना उलगुलान संघटनेचे पदाधिकारी पुरूषोत्तम नळे, तेजराज कुबळे, अश्विन माऊलीकर, श्रिधर रावला, राजू काटम, इंद्रदास मेश्राम, साहिल झाडे, तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here