उद्या जिवतीत आयोजित कविसंमेलनात ॲड. सचिन मेकाले यांच्या ‘तूच ठरव’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानचे आयोजन
जिवती : अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान व स्मृतिशेष शंकर मेकाले प्रतिष्ठानच्या माध्यमाने शेणगाव येथील कवी ॲड. सचिन मेकाले यांच्या ‘तूच ठरव’ कवितासंग्रहाचे प्रकाशन व कविसंमेलन २५ डिसेंबरला जिवती येथे पार पडणार आहे. जिवती येथील पंचायत समीती सभागृहात सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. वामनराव चटप राहतील. रेणूका मेकाले यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन होईल. यावेळी समीक्षक डॉ. प्रतिभा वाघमारे व कवी अविनाश पोईनकर हे कवितासंग्रहावर भाष्य करतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती अंजना पवार, उपसभापती महेश देवकते, गटविकास अधिकारी विजय पेंदाम, माजी उपसभापती प्रा. सुग्रीव गोतावळे, प्राचार्य डॉ. संभाजी वारकड, समीक्षक डॉ. राज मुसणे, आदर्श शिक्षक प्रशांत कातकर, अक्षरचे अध्यक्ष रत्नाकर चटप उपस्थित राहतील.
दुस-या सत्रात प्रसिद्ध कवी किशोर मुगल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडणार आहे. यावेळी कवी तथा पोंभुर्णाचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, कवी तथा विरुर स्टेशनचे ठाणेदार राहूल चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सूत्रसंचलन कवी नरेशकुमार बोरीकर करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माणिक मेकाले, राहूल गायकांबळे, राजकुमार चिकटे, सुर्यकांत ढगे, देविदास खंदारे, मिथून बावगे, सय्यद शब्बीर जागिरदार, अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान व शंकर मेकाले प्रतिष्ठान तर्फे करण्यात आले आहे.