छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यास तात्काळ अटक करण्यात यावी- नागेश कडुकर
कर्नाटक राज्यातील सदाशिव नगर, बँगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर तात्काळ अटक करून कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी कर्नाटक राज्य शासनास सूचित करण्यात यावे या संदर्भात मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर मार्फत शिवसेना प्रणित युवा सेना तालुका समन्वयक बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे नागेश कडुकर यांच्या तर्फे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर महाराजाच्यां विटंबना संदर्भात कर्णाटक मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यानीं पत्रकारांनसमोर वक्तत्व केले कि , “राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना म्हणजे किरकोळ गोष्ट आहे याला फार महत्व द्यायचे नसते” असे निदंनिय वक्तत्व बसराज बोमय्या यानीं केले. त्याबद्दल शिवसेना प्रणित युवासेना चद्रंपुर च्या वतिने जाहीर निषेध करण्यात आला त्याच बरोबर बसवराज बोमय्या यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
भविष्यात छत्रपति शिवाजी महाराज तसेच इतर महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होऊ नये. झाल्यास अशा विकुत प्रवूतीच्या लोकांवर धाक निर्माण व्हावा यासाठी कठोर कायदे अमलात आणावे यासाठी आपण भारत सरकार कडे मागणी करावी अशी विनंती सुद्धा निवेदनातून करण्यात आली.
सदर निवेदन तालुका समन्वयक नागेश कडुकर यांच्या नेतृत्वात सागर धनकसार, अमोल मगांम, प्रविन ऊके, ॲडवोकेट अजितभाऊ पाडें, हसंराज खरोले, तोसिफ खान, चेतन कामतवार व इतर शिवसैनिकांनी सादर केले.