बेमुदत कामबंद आंदोलनामुळे विद्यापिठाचे कामकाज प्रभावित
विद्यापिठीय कामात व्यत्यय, विद्यार्थ्यांना नाहक त्रासाचा करावा लागतोय सामना
जिल्ह्यातील महाविद्यालयीन समस्त कर्मचारी आंदोलनात सहभागी
गडचिरोली, सुखसागर झाडे
कर्मचाऱ्यांच्या न्यायोचित व रास्त प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील ५ दिवसांपासून सुरू असलेल्या गोंडवाना विद्यापिठातील अधिकारी व कर्मचारी यांचे बेमुदत कामबंद आंदोलन आज ही सुरूच आहे. हे आंदोलन शासनानेच कर्मचाऱ्यांचा भेदभाव न करता आंदोलनाची दखल घेवून शासन अधिकारी व कर्मचारी यांचे रास्त मागण्यां निकाली काढतील अशी अपेक्षा होती. परंतु आजही राज्य व्यापी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल शासनाने अद्यापही घेतल्याचे दिसुन येत नसल्याने कर्मचाऱ्यांचा रोष वाढत असल्याचा दिसून येत आहे.
सदर आंदोलनांचा प्रभाव विद्यार्थी वर्गावर, महाविद्यालयीन कामकाजावर पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ही विद्यापिठ प्रशासन, शासनाप्रती रोष निर्माण होत आहे. विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी असल्याने सर्वच कार्यालयात भयान शांतता पसरली आहे.
हे सदर आंदोलन असेच सुरू राहिल्यास विद्यापिठाच्या विकासात्मक धोरणावर तसेच आगामी होणाऱ्या परिक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण होवू शकते त्यामुळे शासनाने सदर आंदोलनाची ताबडतोब दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची पुर्तता करावी. हिच भावना आंदोलनात सहभागी संपूर्ण कर्मचाऱ्यांची दिसून येत आहे. सदर आंदोलनास गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन कर्मचारी महाविद्यालयीन परिसरात आंदोलन करून सहभाग दर्शविला आहे. तसेच विविध संघटनांनी सुद्धा पाठिंबा दर्शविला आहे.