अकोले नगरपंचायती मध्ये १३ ही प्रभागात शांतेत मतदान…
मतदारांचा चांगला प्रतिसाद… ८०.६९%मतदान…
प्रभाग १० मध्ये विक्रमी ९०% मतदान….
अहमदनगर
संगमनेर २२/१२/२०२१
प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गायकर पाटील
अकोले (अहमदनगर) नगरपंचायती च्या १३ प्रभागात काल एकूण ८०.६९% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वाधिक ९१ टक्के तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वात कमी म्हणजे 69.72% मतदान झाल्याचे आढळून आले.
मतदान प्रक्रिया शांतपणे पार पडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मतदान प्रक्रियेत कोणता ही अनुचित प्रकार व घटना न घडल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी श्री विक्रम जगदाळे व पोलीस निरीक्षक श्री मिथुन घुगे यांनी दिली.
प्रभाग क्रमांक व पार पडले ले मतदान .
प्रभाग क्रमांक १…७९२/६७५-(८८.५८ टक्के)
२..४९०/४२३-( ८६.३३ टक्के)
३..५७१/४९५-
५७२/३९२-. (एकूण ६९.७२%)
४..रिक्त
५..५०८/३९३
५०६/३८३ (एकूण ७६.५२%)
६..४६७/३२५, ४६८/३६३ …(७३.६६ टक्के.)
७….५०४/४०७, ५०४/३७३ (एकूण ७७.३८ टक्के)
८..५२३/४५२,.५२३/४६९ (एकूण ८०.०४ टक्के.)
९…७४१/ ५६७ ..(७६.५२ टक्के)
१०… ४२३/३८७ .(.९१.४९ %)
११…रिक्त
१२ ..४५०/३८६, ४५०/३६४. (एकूण ८३.३३%)
13..रिक्त
14..रिक्त
१५…७६२/६१८ (८१.२१%)
१६..४६५/३८९. (८३%)
१७..५०७/४५५(८९.७४%)
मतमोजणी उर्वरित चार प्रभाग मधील निवडणूक प्रक्रिया पार पडल्या नंतर जानेवारी २०२२ मध्ये होणार आहे . कोण विजयी होणार , कोणाची हार होणार या चर्चेला उधाण आले आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी विजयाचा दावा केला आहे.