आदर्श मुख्याध्यापिका कल्पना ठेंगरे यांचा वाढदिवस साजरा
चंद्रपूर : काल दि. २२ डिसेंम्बर ब्रम्हपूरी तालुक्यातील सरस्वती विद्यालय गांगलवाडी च्या मुख्याध्यापिका कु. कल्पना काशिराम ठेंगरे मँडम यांचा वाढदिवस.
सरस्वती विद्यालय गांगलवाडी एक कोमेजलेले रोपटे, याला जीवनदान देऊन त्याचे वटवृक्षात रूपांतर करतांना अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास विपरीत परिस्थितीत आपल्या बोटावर मोजता येतील एवढ्या सहकाऱ्यासह प्रत्यक्ष पालकांच्या घरोघर जावून एक किमी ते बारा पंधरा किमी अंतरावरील आठदहा गावामधिल विद्यार्थी गोळा करून त्यांना घडविण्यासाठी विनाअनुदानित वर्गावरील शिक्षकांचे पगार व त्यांच्या पोषण आहाराचा खर्च स्वतःच्या पगारातून करणे. ऐवढेच नाही तर शाळेसाठी किराया ने घेतलेल्या दोन इमारतीचा किराया व शाळेसाठी लागणारा सर्व खर्च स्वतःहा करतात. विद्यालयात सर्व उपक्रम हिरिरीने राबवून विद्यार्थ्यांंचा सर्वांगिन विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्नशिल असतात. केवळ कागदोपत्री नाही तर विद्यार्थांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी जातीने लक्ष देतात. संस्थेच्या पदाधिकारी व मुख्याध्यापक म्हणून शाळेला दांडी मारणे किंवा ऊशिरा शाळेत येणे हे मी चार वर्षाच्या काळात कधिही बघितले नाही. सेव्वानिवृतीला एक वर्ष बाकी असतांना सुद्धा आम्ही दोन समायोजित शिक्षक मागेपुढे मूळ आस्थापणेत गेल्यामूळे आमचा कार्यभार सहकाऱ्यावर न लोटता स्वतःहा इंग्रजी व मराठी भाषा विषय शिकवितात. माजी विद्यार्थी मेळाव्यातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी व्यक्त केलेल्या भावना यामधून शाळेचे कार्य अधोरेखित होते. आज एका सरलस्वभावी, विद्यार्थीप्रिय, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर मुख्याध्यापिकेचा वाढदिवस. अनेक अडचणीवर मात करून, अनेक समस्या व संकटांना धैर्याने व शांततेने लढा देत एका कोलमडून पडलेल्या रोपट्याचे तन मन धन लावून वटवृक्षात रूपांतर केले. पण शेवटी परिस्थितीच अशी यावी, अचानक महावृक्ष कोलमडून पडावा. ज्यांचे महावृक्ष घडणीत मोलाचे योगदान आहे अशा सर्वांना किती वेदना होत असेल. पण यातही भविष्यातील ऊज्ज्वल यशाची बीजे पेरली असावी अशी अपेक्षा बाळगू या. विद्यार्थी व सर्व सहकाऱ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा! अशा आदर्श व्यक्तीमत्त्वाला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
शब्दांकन- जी.एम.लांडे