मोबीन बेग यांचा राष्ट्रवादीला रामराम तर काँग्रेसमध्ये प्रवेश
कोरपना/प्रतिनिधी : येथील मोबिन बेग यांचे राष्ट्रवादी पक्षांमध्ये प्रवेश करून अनेक सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सिहाचा वाटा राहिला. त्यांच्या कार्याची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोबिन बेग यांना कोरपना शहर अल्पसंख्याक अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती. मात्र राष्ट्रवादी पक्षांना अशा सामान्य जनतेच्या सेवेत राहणारा युवकांचे कार्य पसंत नसावे म्हणून शहराध्यक्ष पदावरून कमी करण्यात आले. त्यामुळे मोबीन बेग यांनी माननीय पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थित कोरपना येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी मोबिन बेग यांना काँग्रेस पक्षाचा दुपट्टा टाकून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला.
अशा या अल्पसंख्यांक शहराध्यक्षांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला असल्याने राष्ट्रवादी पक्षाचा युवकांमध्ये पकड असणारा युवक नेता गेला असल्याने राष्ट्रवादीत मोठी खिंडार पडली. नुकताच होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या वेळेवर यांच्या प्रवेश झाल्याने अल्पसंख्यांक मध्ये अनेक नागरिक काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहे. या नगरपंचायत च्या निवडणुकीत मोबिन बेग काँग्रेस पक्षासोबत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आघाडी पक्षाची दमछाक होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे राष्ट्रवादीमध्ये अनेक नागरिक मोबिन बेग यांच्या जाण्यामुळे मतदार नाराज असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही राष्ट्रवादीची मोठी खिंडार पडलेली भरून निघणे शक्य नाही. या होऊ घातलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षला मोबीन बेग यांच्या माध्यमातून एक प्रकारे बळकटी मिळाली आहे. तेव्हा मोबीन बेग यांच्यामुळे होत असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीवर अल्पसंख्याक समाज मध्ये नाराजीचा सूर पहावयास मिळत आहे. कोरपना शहराच्या या निवडणुकीमध्ये अनेक पक्षाने काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिल्याने कोरपना शहरांमध्येच काँग्रेस पक्ष वरचढ ठरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.