अंधश्रद्धा ही मानवी समाजाला मिळालेला एक अभिशाप- ठाणेदार अविनाश मेश्राम
पोलिस विभागाचा उपक्रम ; आझादी का अमृत महोत्सव
महालगावं येथे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम
अंधश्रद्धाळू माणूस आपली विचारशक्ती हरवून बसतो.श्रद्धा ही मानवी जीवनातील एक अमूल्य ठेव आहे. बुवा,साधू, महाराज यांच्याकडून फसवल्या गेलच्या वार्ता आपल्या कानावर येतात. सध्याच्या धावपळीच्याच्या जीवनातील लालसा, तणाव,गैरसमजाचा अतिरेक हा शेवटी अंधश्रद्धेत परिणीत होऊन आपला समाज अंधारात चाचपडत आहे.अंधश्रद्धा ही मानवी समाजाला मिळालेला एक अभिशाप आहे असं प्रतिपादन ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी केलं.
ते महालगाव येथील श्री संत सद्गुरु परमहंस लक्ष्मण बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात पोलीस विभागामार्फत आझादी का अमृत महोत्सव निमित्त आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात बोलत होते.या वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर,जिल्हा सचिव धनंजय तावडे,पोलीस उपनिरीक्षक जाधव उपस्थीत होते.
पुढे बोलताना ठाणेदार मेश्राम यांनी समाजाला अंधश्रद्धा पासून दूर जात विज्ञानवादा ची कास धरीत संत ,महात्मा व महापुरुषांच्या विचार अंगिकारण्याचे आवाहन केलं. या वेळी अनिल दाहगावकर यांनी जादूटोणा कायद्याची पार्श्वभूमी सांगितली.धनंजय तावडे यांनी भोंदू महाराज कसे फसवतात याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. उपनिरीक्षक जाधव यांनी जादूटोणा कायद्याच्या कलमा, दोषींची सजा या बाबत माहिती देत प्रगत शेती,शिक्षण या बाबत मार्गदर्शन केलं.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री संत सद्गुरू परमहंस लक्ष्मण बाबा पुण्य स्मरणोत्सव भक्तीधान सोहळा समिती महालगाव व पोलीस विभागाने परीश्रम घेतले.या कार्यक्रमास शेकडो नागरिकांची उपस्थित होती.