पी.यु.सी. केंद्रधारकांनी पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावे – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

0
832

पी.यु.सी. केंद्रधारकांनी पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक केंद्राच्या दर्शनी भागात लावावे – उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे

 

चंद्रपूर, दि. 15 डिसेंबर : परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व पी.यु.सी. केंद्र धारकांनी त्यांच्या केंद्रावर वाहन तपासणीकरिता आल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या पी.यु.सी. प्रमाणपत्र शुल्काचे फलक (रेट बोर्ड) हे पीयूसी केंद्राच्या मुख्य दर्शनी भागावर ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावण्याबाबत सूचित केले आहे.

वाहन प्रकारानुसार त्याचे दर निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये दुचाकी वाहन-35 रु.,पेट्रोलवरील तीन चाकी वाहन-70 रु., पेट्रोल, सीएनजी, एलपीजीवर चालणारी चारचाकी वाहने-90 रु. तर डिझेलवर चालणाऱ्या वाहनांकरिता 110 रुपये दर निश्चित करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने पी.यु.सी. केंद्रधारकांनी आपल्या पी.यु.सी. केंद्रावर प्रमाणपत्र दराचे फलक ठळक अक्षरात लावावे, दराचे फलक ठळक अक्षरात लावल्यास ग्राहकांना योग्य दराची माहिती मिळून संभ्रम दूर होण्यास मदत होईल.

तरी जिल्ह्यातील पी.यु.सी. केंद्र धारकांनी न चुकता आपल्या केंद्रावर दर फलक लावावे व त्या कार्यवाहीचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास सादर करावा. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here