28 उमेदवार मैदानात तर 7 उमेदवारांनी घेतले नामनिर्देशन अर्ज मागे

0
762

28 उमेदवार मैदानात तर 7 उमेदवारांनी घेतले नामनिर्देशन अर्ज मागे

कोरपना नगर पंचायत निवडणूक

 

कोरपना, प्रवीण मेश्राम
जिल्ह्यातील सहा नगर पंचायत मध्ये निवडणूकीचा शंखनाद झाल्यानंतर विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज 13 डिसेंबर 2021 ला नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने कोरपना येथे 7 कोरपना नगरपंचायत मध्ये 14 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे कोरपना येथे 14 जागांसाठी 28 जागांसाठी उमेदवार निवडणूकीच्या मैदानात उभे राहिले आहेत. कोरपना नगरपंचायत मध्ये 3 प्रभागातील निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे.

कोरपना ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यानंतर ही दुसरी निवडणूक आहे. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवलेली आहे. विशेष म्हणजे मागील चाळीस वर्षापासून त्यांचीच सत्ता आहे विशेष. काँग्रेसच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला हद्दपार करण्यासाठी यावेळी कोरपना शहर परिवर्तन आघाडी स्थापन करण्यात आली आहे. आघाडीच्या अधिकृत घोषणेची प्रक्रिया तेवढी बाकी आहे. आघाडीत भाजप, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना व शिवसेना यांचा समावेश आहे. तर काँग्रेस सर्वच्या सर्व जागावर मैदानात आहे. भाजपचे उमेदवार हे पक्षाच्या कमळ चिन्हावर तर आघाडीतील इतर उमेदवारांनी अपक्ष नामनिर्देशन दाखल केल्याने ते वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.

13 डिसेंबर हा नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याचा दिवस असल्याने दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची रेलचेल पहायला मिळाली. कोरपना येथे तीन प्रभागात ओबीसी आरक्षणामुळे निवडणूकीला स्थगिती आहे. त्यामुळे 14 प्रभागात निवडणुक होत आहे. आज 3 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने फक्त 28 उमेदवारच मैदानात राहिले आहेत. मागे घेणा-यांमध्ये भाजपचे 3, राष्ट्रवादी 2 तर अपक्ष 2 अशा 7 जणांचा समावेश आहे. मागील चाळीस वर्षापासून कोरपना येते असलेले काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी यावेळी कोरपना शहर परिवर्तन आघाडी स्थापन करण्यात आली आहे. ही आघाडी स्थानिक स्तरावर तयार करण्यात आली आहे. काँग्रेसने सर्वच्या सर्व जागा उभे करून प्रतिस्पर्धी आघाडीला माता देण्यासाठी व्युहरचना केली आहे. ओबीसी आरक्षणावर आज निर्णय येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, परंतु कोणताच निर्णय झाल्ल्यामुळे उमेदवारांची निराशा झाली आहे. 14 डिसेंबर ला पक्ष व अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी दिसून येणार आहे.

कोरपना नगर पंचायतीमध्ये 14 प्रभागात 28 उमेदवार निवडणूक रिंगणात
आदिवासी अतिदुर्गम आणि तेलंगणाला लागून असलेल्या कोरपना तालुक्यात नगरपंचायत निवडणूक असलेल्या नगर पंचायती मध्ये यावेळी ओबीसी आरक्षणाचा मुद्दामुळे 3 प्रभागात निवडणूकीला स्थगिती मिळालेली आहे. त्यामुळे फक्त 14 प्रभागात निवडणूक होऊ घातलेली आहे. आज सोमवारी 28 उमेदवारांना कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. सोमवारी निकाल येईल याची दिवसभर चर्चा होती परंतु उद्या यावर निर्णय येण्याची शक्यता वर्तविली जात नसल्याने उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मतदारांच्या भेटीगाठीला सुरूवात केली आहे. आज चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here