१४ वर्षीय मुलीचा आळीपाळीने लैंगिक छळ
◆ समाजमन सुन्न करणारी घटना; तिन आरोपी अटकेत
◆ पिडीतेचं पुनर्वसन करून एक करोडची तात्काळ मदत द्या – रुपेश निमसरकार पँथर
चंद्रपूर : जिल्ह्यातील आदिवासी बहुल, मागास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यात मागील दिवसात महिलावर अन्याय, अत्याचार घटना अनेक घडत आहेत. मात्र पोंभुर्णा पोलीस प्रशासन हातावर हात देऊन भुमिका बजावत असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. घटना घडली तेव्हाच पोलीस प्रशासन भुमिका घेते, परंतु घटना व्हाव्या नाहीत म्हणून शासनाने अनेक धोरण सक्रीय केले असताना यांची प्रभावी जनजागृती पोलीसामार्फत केली जात नाही. हा प्रकार अंत्यत खेदजनक असून पोलीसा विषयी जनतेत निंदनीय बाब बनली आहे.
पोंभुर्णा तालुक्यात इतकी मोठी घटना घडून सुद्धा इथले पालकमंत्री, आमदार, खासदार साधी दखल घेत नाही. पिडीते संबधी वा तिच्या पुढील भविष्याकरीता न्याय मिळावा म्हणून पुढे येत नाही. या गंभीर प्रकणात तोंडाला झाकन लाउन बसलेल्या कांग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, सत्ताधारी पक्षात असलेल्या महिला विंग्स कुठे लपल्यात असा घणाघात सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी प्रसिद्धी माध्यमातून केला असून पिडीतेचं पुनर्वसन करुन तात्काळ एक करोड रुपायाची आर्थिक मदत त्यांच्या कुटुबीयांना द्यावी अशी मागणी या माध्यमातून केली आहे.
महाराष्ट्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाओ नारा लावून संविधानीक तरतुदी केल्या आहेत. व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ अंतर्गत बालकांसाठी मोठी तरतूद केली आहे. त्याही नंतर महाराष्ट्राचे महिला धोरण, राष्ट्रीय महिला धोरण मसुदा २०१६ , राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण २००१, बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत, बालक आणि हल्ला, पिडीताकरीता मनोधैर्य योजनेची अमलबजावणी करणे व इतरही धोरणे आहेत. त्यामुळे पोंभुर्णा तालुक्यात ग्रामीण भागात घडलेल्या या समाजसुन्न करणाऱ्या घटनेत त्यांच्या कुंटुबाची मोठी हानी झाली असून मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे या धोरणांच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्यातील पिडीत १४ वर्षीय बालीकेवर घडलेल्या अत्यारात तिचे पुनर्वसन तात्काळ करुन एक करोड ची आर्थिक मदत कुंटुबीयांना जाहीर करुन पिडीत व कुटुबांचे मनोबल वाढवावे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचार व पोलीसांच्या कर्तव्यशुन्य कारभारा विरोधात भुमिका घेऊन महिला सक्षमीकरण, महिला बचाव व तालीबानी व्यवस्थेविरोधात मोठे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी माध्यमातून दिला आहे.