डाॅ. मंदा पडवेकर नेपाळ लुंबीनी येथे सन्मानित
चंद्रपूर स्थित विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉ मंदा पडवेकर यांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण योद्धा पुरस्काराने नेपाळ लुंबीनी येथे सन्मानित करण्यात आले.
समाजकार्य व पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मंदा पडवेकर यांची ,पिपल,नीम, तुलसी अभियान पटना, ग्रीन युथ आॅफ लुंबीनी नेपाळ, कमला जलाधार संरक्षण अभियान जनकपूरधाम नेपाळ , दिदी जी फाऊंडेशन अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या ७५व्याअमृत महोत्सव वर्ष निमित्ताने दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण योद्धा २०२१पुरस्कारासाठी निवड झाली होती.
हा पुरस्कार लुंबीनी सांस्कृतिक नगर पालिका हाॅल खुनगाई भगवान गौतम बुद्ध यांची जन्मभूमी नेपाळ लुंबीनी आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषद,दोन दिवसिय मंथन शिबीर या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी नेपाळच्या अर्थमंत्री श्रीमती सुषमा यादव, विशिष्ट अतिथी मनमोहन चौधरी मेयर लुंबीनी, अवधेश कुमार त्रिपाठी लुंबीनी विकास कोष, पशुपतिनाथ कोईराला सचिव पर्यावरण वन मंत्रालय,वृक्ष मित्र सुरेश शर्मा जनकपूरधाम, विक्रम यादव अभियानी कमला बचाओं,धरा धाम इंटरनॅशनल के संस्थापक डाॅ. सौरभ पांडे जी,डाॅ.विनय श्रीवास्तव वर्ल्ड रेकार्ड होल्डर पर्यावरण संरक्षण गोरखपूर , धर्मेंद्र कुमार पटना आदि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
समाजाच्या विविध स्तरांवर कार्यरत दिन दुबळ्यांचे आसु पुसुन मुखी हास्यफुलवणाऱ्या, राष्ट्र हितासाठी समाजसेवेत समर्पित अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या स्वयंसिद्धा, मंदाताई यांचा सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण क्षेत्रात वावर असून त्या पर्यावरण जनजागृती, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, बीज रोपण,रोपटे तयार करणे असे अनेक प्रकारचे उपक्रम त्या राबवत असतात.
मंदाताई पडवेकर एक उत्कृष्ट साहित्यिक असून त्या पर्यावरण जनजागृती लेखन ही उत्तम रित्या करत असतात.बक्सुआ जंगल बचाओं अभियानत सहभाग अशा अनेक कार्याची दखल घेत, मंदाताईंना हा पर्यावरण योद्धा,नीम वर्ल्ड योद्धा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करून मंदाताईने भारत, महाराष्ट्र, चंद्रपूर नगरीचा गौरव वाढवला .या आधीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले,तरी मंदाताईंचे अनेक संस्था द्वारे सन्मान व आप्त मित्रांकडून अभिनंदन वर्षाव होत आहे.