विविध मागण्यांचे गोंडपिपरी कोतवाल संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
गोंडपीपरी गेल्या ६० वर्षांपासून राज्यातील कोतवाल आपल्या चतुर्थश्रेणीसह इतर मागण्यांसाठी शासनदरबारी मागणी करीत आहे.कोतवाल यांना योग्य काम करून सुद्धा त्यांना समाधानकारक वेतन दिल्या जात नाही वेतन वाढ करावी.तलाठी भरतीत 25 % आरक्षण द्यावे अशा अनेक मागण्यांसह चतुर्थ श्रेणी देऊन न्याय द्यावा सदर मागणी
गोंडपिपरी तशीलदारांमार्फत राज्य शासनाला दिलेल्या निवेदनातून १२ डिसेंबर पर्यन्त मागण्या मान्य न झाल्यास १३ डिसेंबर ला राज्यात होणाऱ्या बेमुदत संपात गोंडपिपरी कोतवाल संघटना सहभागी होणार असे निवेदन दि.९ गुरुवारी देण्यात आले.यावेळी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष गजानन बट्टे,अंबादास गेडाम,प्रकाश कोवे,तुळशीराम आक्केवार, मिलिंद वानखेडे,चंद्रकांत पुणेकर उपस्थित होते.