नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावर पिरिपाचा भाजपाला पाठिंबा
-पत्रपरिषदेत दिली माहिती
रुपेश मंकिवार
पोंभूर्णा:-:
पोंभूर्णा नगर पंचायत २०२१ च्या सार्वत्रिक निवडणुक होऊ घातलेली आहे .या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस सोबत पिपल्स रिपब्लीकन पार्टी यांची चर्चे अंती युती झाली होती. मात्र ऐन वेळी काँग्रेस पक्षाने पिपल्स रिपब्लीकन पक्षाला एकही जागा दिली नसल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोंभूर्णा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी भाजपाला जाहिर पाठिंबा दिला आहे. पिरिपाचा पाठिंबा मिळाल्याने निवडणूकीत मताचे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोंभूर्णा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीचे बिगूल वाजले आहे.अनेक पक्षाची चढाओढ सुरू झाली आहे. अनेक मोठे पक्ष छोट्या छोट्या पक्षाची साथ घेऊन रिंगणात उतरले आहेत.मात्र राज्यात असलेल्या काँग्रेससोबतची पिरीपाची युती पोंभूर्णा नगरपंचायतच्या निवडणुकीत तुटली आहे. काँग्रेसनी आपली फसवणूक केली असल्याची पिरिपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत आपण काँग्रेसची साथ सोडली असून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरूष माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास ठेवून पोंभूर्णा नगरीचा विकास व्हावा या उद्दान्त हेतून पिपल्स रिपब्लीकन पार्टी तालुका पोंभूर्णा भाजपाला पोंभूर्णा निवडणुकीत जाहीर पाठींबा देत असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस तेजराज मानकर व तालुका अध्यक्ष जिवन वनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपा जिल्हा संघटक राम लखिया, भाजपा कामगार सरचिटणीस अजय दुबे,भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अल्का आत्राम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, शहर अध्यक्ष रूषी कोटरंगे, दिलीप मॅकलवार,ईश्र्वर नैताम,नंदू तुम्मुलवार,बंडू ऊराडे, तातूजी मानकर,मनोहर वनकर मारोती मानकर यांची उपस्थिती होती.