‘परिश्रम’ आणि ‘जिद्दीला’ अंत नाही….. शुभमची गगणभरारी
परिस्थितीवर मात करत केले यश संपादन
चंद्रपूर : तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय, इंदिरा नगर येथील शुभम आनंदराव विजया नरुले. अत्यंत गरीब बिकट परिस्थितीतुन शिक्षण घेऊन त्याने आपल्या जिद्दीने यश संपादन केले. भाभा आटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथे सायंटिफिक असिस्टंट म्हणून त्याची नियुक्ती झाली.
हा सगळा प्रवास करताना शुभम ची आई, बहिणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. आई स्वयंपाकाची कामे करायची, वडील फार पूर्वीच वारले. सर्व परिस्थिती आईवर त्यात चार मुल तीन मुली असा संसाराचा गाडा मोठ्या हिमतीने आईने चालवला. तिन्ही मुलींचे शिक्षण, लग्न करून त्यांना संसाराला लावलं. मुलाच्या शिक्षणासाठी तिने अपार कष्ट घेतले.
शुभमने प्राथमिक शिक्षण मागास भागातील जिल्हा परिषद पंडित जवाहरलाल नेहरू शाळेतून घेतले. माध्यमिक शिक्षण त्याने स्व. बाबुराव वानखेडे विद्यालय, इंदिरा नगर येथील शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर त्याने दहावीनंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा श्री साई पॉलिटेक्निक, चंद्रपुर येथून पूर्ण केले. त्यात त्याला कॅम्पसमधील कंपन्यांनी जॉब ऑफर केली. मात्र त्याच स्वप्न काही वेगळच होत. त्याने BIT बल्लारपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची पदवी संपादन केली. त्यानंतर अथक परिश्रम घेऊन त्याने वैज्ञानिक होण्याचं स्वप्न पाहिल. ते आज घडीला पूर्ण होत असताना त्याने मिळवलेले यश हे या मागास भागातील विद्यार्थी मित्रांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यासाठी त्याने ज्या ठिकाणी एवढी मेहनत घेतली ते तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय, इंदिरा नगर नेहमीच विध्यार्थ्यांना मार्गदर्शक व मागास भागातील विध्यार्थ्यांना प्रेरणा देत राहील. शुभमला जीवनातील सर्वोच्च यश संपादन करण्यासाठी तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय तर्फे भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.