कॉंग्रेस—भाजपाच्या भ्रष्ट राजकारणाला सशक्त पर्याय म्हणून आम आदमी पार्टीला चंद्रपूर ची जनता स्वीकारेल असा आम्हाला विश्वास – रंगाभाऊ राचुरे प्रदेश संयोजक आप
स्थानिक महानगरातील इंडस्ट्रियल इस्टेट सभागृहात पत्रकार परिषदेला संबोधित केले यावेळी राज्य कमिटी सदस्य राज्य उपाध्यक्ष किशोर मांध्यान राज्य संघटन मंत्री विजय कुंभार राज्य सचिव धनंजय शिंदे उपस्थित होते.
राज्याच्या राजकारणात कॉंगेस—भाजपाला पर्याय म्हणून, अरविंद केजरीवाल यांचे नेतृत्वातील आम आदमी पार्टी महाराष्ट्रात वेगाने वाढत आहे.
दिल्लीतील सुशासन, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, नेत्यांना मिळत असलेल्या मोफत वीज, पाणी, चांगले आरोग्य आणि शिक्षण हे सामान्य माणसाला देवूनही देशातील नफ्यातील दिल्ली हे एकमेव राज्य असल्यांचे केंद्र सरकारच्या कॅगच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील सामान्य माणसाचे सरकार, चंद्रपूर जिल्ह्यात विवीध निवडनुकीच्या माध्यमातून आणण्याचा संकल्प विविध मान्यवरांनी व्यक्त केला. असून, या दृष्टीने आपचे कार्यकर्ते मेहनत घेत आहे. मागील काही वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीने सामान्य नागरिकांसाठी केलेले काम, कोरोणा काळात सामान्य रुग्णांना दिलेला दिलासा यामुळे आम आदमी पार्टीवर चंद्रपूर जिल्ह्यातील जनता विश्वास ठेवतील असे राज्याचे संघटनमंत्री विजयजी कुंभार यांनी म्हटले.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे भविष्य भाजपा—कॉंग्रेसच्या हातात सुरक्षीत नसून, हे दोनही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
या परिस्थितीत जनतेला स्वच्छ आणि चांगला राजकीय पर्याय आम आदमी पार्टीच असल्याची खात्री पटत असल्यांने, मोठया प्रमाणावर जनता आम आदमी पार्टीत प्रवेश करीत आहे.
येणारी मनपा , नगर परीषदेसह सर्व निवडणूका आम आदमी पार्टी लढविणार असून, चांगले आणि स्वच्छ प्रतिमेच्या राजकीय कार्यकर्त्यानी, नागरीकांनी आम आदमी पार्टीत सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
यावेळी आपचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे राज्याचे कोषाध्यक्ष जगजीत सिंग, सुनिल देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष ,भिवराज सोनी जिल्हा कोषाध्यक्ष, मयूर राईकवार, जिल्हा युवा अध्यक्ष ,संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, राजेश चेडगुलवार सोशल मीडिया प्रमुख, राजू कुळे महानगर सचिव, सिकंदर सागोरे एडवोकेट राजेश विराणी ,प्रतीक विराणी, मधुकरराव साखरकर ,अशोक भाऊ आनंदे, सुनील जी भोयर, योगेश आपटे,महादेव बावणे तथा इतर आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.