शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत महामानवास अभिवादन
गडचिरोली, सुखसागर झाडे
चामोर्शी : स्थानिक शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत बौद्धीसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करीत महामानवास अभिवादन केले.
याप्रसंगी शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ब्हि. व्ही. धोटे, प्रा. ललिता वसाके, प्रा. सुखसागर झाडे, प्रा. सोनी आभारे, प्रा. पल्लवी कोटांगले, शिक्षकेतर कर्मचारी नितेश पोरटे, सौरभ सहारे, भावना सुर, भावना चांदेकर, आशिष मेश्राम, लोभेष गोर्लावार उपस्थित होते.
विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ब्हि.व्ही.धोटे यांनी आजच्या संगणकीय, स्पर्धात्मक युगामध्ये डॉ. बाबासाहेबांचे दूरदर्शी विचार अंगिकारण्याची अत्यंत गरज आहे . प्रत्येकांनी त्यांचे मौलिक विचार आत्मसात करून, प्रेरणा घेत त्या दृष्टीने वर्तवणूक करीत समाज हिताचे कार्य करीत भविष्य पिडिला सामाजिक बांधिलकीचा असाच रथ पुढे नेण्याचे आवाहन करावे. असे मौलिक विचार प्रकट केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.पल्लवी कोटांगले यांनी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. या म्हणीची आठवण करून देत उत्कृष्ट संचालन केले.
प्रा. सुखसागर झाडे यांनी शिका,संघटित व्हा,संघर्ष करा, या बाबासाहेबांच्या आव्हानात्मक उद्धगाराचे स्मरण करीत कार्यक्रमात उपस्थित अतिथी जनांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.