महापरिनिर्वाण दिनी आप ने दिले डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
दिनांक 6 डिसेंम्बर 1956 रोजी जनतेचे कैवारी, संविधानाचे जनक, विश्वरत्न, प. पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. सर्व ठिकाणी शोकांतिका पोहचली.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन 65 वर्ष झाले तरी सर्व जनतेच्या मनात त्यांच्या प्रति भावना आहे. त्यांनी लिहलेले संविधान आज पर्यंत व आजतागायत लागू राहील अश्या महामानवाला आज दिनांक 6 डिसेंम्बर 2021 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा आणि महानगर टीम ने अभिवादन करत महामानवाला आठवण करत त्यांचे आचार विचार स्वतः मध्ये अंगीकृत करून जनतेची सेवा करणार असे ठाणले आहे. या वेळी आप चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, महानगर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, कालिदास ओरके, शेषराव कायरकर, सुजित चेडगुलवार, दिलीप तेलंग, बबन कृष्णापल्लीवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.