स्मशानभूमी जागेच्या वादावर इंदिरानगर वासीयांची प्रशासनाकडे धाव

0
798

स्मशानभूमी जागेच्या वादावर इंदिरानगर वासीयांची प्रशासनाकडे धाव

सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण न करता शांततेत सलोख्याने वाद मिटवण्याची लोकप्रतिनिधींना विनंती

 

राजुरा, ४ डिसेंम्बर : सध्या राजुरा शहरात स्मशानभूमी जागेचा वाद समोर आला असून सामाजिक व धार्मिक असंतोष निर्माण होण्याची चिन्हे पुढे येत आहेत. सामाजिक व धार्मिक सलोख्यातुन हा जागेचा वाद मिटवण्यात यावा अशी मागणी जनतेतून केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, २६ तारखेला सकाळी हिंदु, बौध्द व आदीवासी समाजासाठी असलेल्या स्मशानभुमीची जागा रुंदी १९ फुट अतिक्रमण करून कब्रस्तानचे सुरक्षा भिंतीसाठी जागा साफ करण्यात आली.
कब्रस्तान समिती यांनी दिनांक २६ नोव्हेंम्बर रोजी संध्याकाळी ८ वाजता इंदीरानगर वार्ड वासीय लोकांची मिंटीग घेवुन नगर परिषद अध्यक्ष २७ तारखेला रस्त्याकरिता मोजमाप करण्यासाठी येणार असल्याची माहीती दिली. व त्यानंतर २७ तारखेला हिंदु, बौध्द व आदीवासी समाजासाठी असलेल्या स्मशानभुमीची जागा रुंदी ४० फुट बेकायदेशीरपणे रस्त्यासाठी घेवुन जेसीबी चालवुन हिंदु, बौध्द व आदीवासी समाजाचे असलेले मातीची समाधी जेसीबी ने तोडुन साफ करून समाधीची विटंबना करण्यात आली.
२७ तारखेलाच हिंदु बौध्द व आदीवासी समाजाचे लोक जमा होवुन शांततेपुर्वक हिंदु, बौध्द व आदीवासी स्मशानभुमी जागेवरचे काम थांबविले. यावेळी काही मुस्लीम लोक शांतताभंग करण्यासाठी हिंदु, बौद व आदीवासी लोकांवर अरेरावीने स्मशानभुमीवर रस्त्याचे काम चालु ठेवले व तिथल्या मुस्लीम समाजानी जेसीबी लावुन जुना रस्त्यावर दगड टाकून स्मशान भुमीकडे जाणारा रस्ता बंद केला. त्यामुळे हिंदु, बौद्ध व आदीवासी लोकांना स्मशानभुमीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.

हिंदु बौद्ध व आदीवासी लोकांनी या बद्दलची माहीती नगर परिषद अध्यक्ष यांना दिली परंतु नगर परिषद अध्यक्ष यांनी ऐकले नाही. उलट नगर परिषद अध्यक्ष यांनी काही मुस्लीम बांधवांच्या संगनमताने दिनांक २८ नोव्हेंम्बर रोजी काम चालू ठेवले.

मुस्लीम समुदायाच्या लोकांनी बेकायदेशीरपणे हिंदु, बौध्द व आदीवासी समाजाची एकुण १९ फूट स्मशानभुमीची जागा घेवुन हिंदु, बौध्द व आदीवासी समाजावर अन्याय करुन सामाजीक वातावरण दुषीत करून सामाजीक तणाव निर्माण केला आहे.

राजुरा शहरातील प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष नगर सेवक यांनी हिंदु, बौध्द व आदीवासी समाजाची एकुण ५९ फुट स्मशानभूमीची जागेवरील काम थांबविण्यात यावे. आणि जे काही मुस्लीम समाजातील लोक अरेरावी करत असेल त्यावर पोलीस कारवाई करण्यात यावी. व नगर परिषद राजुरा यांनी कब्रस्तानची ६ मिटर जागा तसेच हिंदु, बौद्ध व आदीवासी समाजातील स्मशानभुमीची ६ मिटर जागा घेवुन मधोमध रस्ता काढून मुस्लीम व हिंदु, बौध्द, आदीवासी या समाजाचा तणाव कमी करावा. वाद मोठा होऊ नये अथवा वाढू नये यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून पुढाकार घेऊन सामाजिक व धार्मिक शांतता व सुव्यवस्था राखावी, असे इंदिरा नगर वॉर्डातील रहिवाशांचे म्हणणे आहे.


स्मशानभूमीच्या जागेवरून सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण न होता यावर वेळीच तोडगा काढून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी इंदिरा नगर वासीय हिंदू, बौद्ध व आदिवासी जनतेने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी राजुरा, तहसीलदार राजुरा, आमदार राजुरा यांच्याकडे २८ नोव्हेंबरला निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here