राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्ली कडे आप ची तक्रार
‘वन कर्मचाऱ्यांचा आतंकवाद’ पहिल्या प्रकरणात एकाची हत्या दुसऱ्याचा तोडला पाय, दुसऱ्या घटनेत 6 मजुरांना मारहाण करून गुप्तांगावर लावले करंट
● गरीब कुटुंबातील समोसे विकणारा सुरेंद्र देवडकर, महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील बाबूपेठ येथील इतर चौघांसह आपली झोपडी दुरुस्त करण्यासाठी बांबू आणण्यासाठी जुनोना जंगलात गेला.
27 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 च्या सुमारास सायकलवरून पाच जण जुनोना बाबूपेठ जंगलात गेले आणि सकाळी 10.00 वाजण्याच्या सुमारास ते बांबू आपल्या सायकलवर बांधत असताना बालाजी राठोड परिसरातील बीट गार्ड इतर तिघांसह आले. त्यांनी सगळ्यांना थांबवून बांबू का तोडले म्हणून सर्वना बांबूच्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील दोघे जंगलात पळून गेले, मात्र सुरेंद्र देवडकर, किशोर ठाकूर आणि विलास मुथा यांना बेदम मारहाण केली. बांबू आणि सायकल जंगलात सोडून सर्व जंगलात पळून गेले.
सुरेंद्रच्या मुलाच्या म्हणण्यानुसार, तो घरी परतला नाही आणि वनविभागाचे लोक घरी येऊन त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करतील या भीतीने तो लपून बसला. भीतीपोटी 30 सप्टेंबर रोजी सुरेंद्रने विष प्राशन केले, त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि रात्री उशिरा उपचार करून घरी परतला. दुसऱ्या दिवशी 1 सप्टेंबर रोजी सकाळी 6.30 च्या सुमारास सुरेंद्रचा मृत्यू झाला.
मृताची पत्नी सविता हिने पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रत काढली. सरकारी रुग्णालयाने केलेल्या शवविच्छेदनात फुफ्फुसे, मांड्या आणि पाठीसह शरीराच्या विविध भागांवर अनेक जखमा आढळून आल्या, ज्याचा परिणाम सुरेंद्र देवडकर यांच्या वैयक्तिक आणि सामूहिक मारहाणीत झाला असावा असे डॉक्टरांचे मत आहे.
मृत सुरेंद्र यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. सुरेंद्र यांच्यासोबत असलेल्या किशोर ठाकूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, आजही त्यांच्या पायावर डॉक्टरांच्या बँडेज बांधल्या आहेत, त्यांना चालता किंवा उठता येत नाही.
● त्याच दुसऱ्या प्रकरणात
चंद्रपूर जवळील चिचोली गावात 24 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर वन परिक्षेत्र अधिकारी आपल्या 6/7 कर्मचार्यांसह गावात पोहोचले आणि त्यांनी ईश्वर रामटेके, हनुमान आसुटकर आणि संदीप आसुटकर यांना चंद्रपुरातील रामबाग वनविभागाच्या कार्यालयात अवैध शिकारीच्या संशयावरून आणले. याठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्याच्या पाठीवर आणि पायावर प्लास्टिकच्या काठ्यांनी वार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा आकाश चांदेकर, मंगेश आसुटकर, संदीप नेहरे यांना वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली. कपडे काढून सर्वांच्या पायावर मांडयावर मारझोड़ करीत त्यांनी या लोकांच्या गुप्तांगा वर वारंवार करंट देण्याचे अमानुष कृत्य केले. या लोकांनी शिकार केली नसल्याचे वन अधिकाऱ्यांना समजल्यानंतर या लोकांना सोडून देण्यात आले.
दोन्ही घटनांमध्ये वनकर्मचाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून एका गरीब व्यक्तीचा खून करणे, दुसऱ्याचा पाय तोडणे, संशयाच्या आधारे ६ जणांना ताब्यात घेणे, त्यांना मारहाण करणे, गुप्तांगांना अमानुष करंट लावण्याचा प्रकार केला आहे . त्यांनी अधिकारांचा गैरवापर करून. घृणास्पद प्रकार सर्व वन अधिकारी व कर्मचारी यांनी संगठित गुन्हेगारी प्रमाणे संगठित होऊन घटना घडवून आणली आहे. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे, अशा अनेक घटना या वनकर्मचाऱ्यांकडून घडवून आणल्या जातात, किंबहुना या गरीब लोकांमुळेच जंगलाचे संरक्षण होत आहे, जल , जंगल , जमीन या लोकांचा हक्क आहे . अगोदरच सरकारने काही भांडवलदारांना कौड़ी च्या दराने जंगलतील खनिज संपत्ति लुटायला दिली आहे . अश्या मोठ्या कंपनी कडून सरासपने वन नियमाची मोडतोड़ होते पन यांच्या कार्यवाही करण्याची हिम्मत मात्र वन विभाग कड़े नाही पन या प्रकरणात पीड़ित हे गरीब आणि कष्टकरी कुटुंबातून आहे. 80, 90 च्या दशकात आदिवासीबहुल भागात वन अधिकारी ज्या प्रकारे अशा घटना घडवत होते. या लोकांना खोट्या केसेसमध्ये फसवून महिलांवर अत्याचार करीत होते .त्यावेळी येथील आदिवासींनी नक्षलवाद्यांची मदत घेतली आणि आता नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे अशा भागातील आदिवासींवरील वन कर्मचाऱ्यांची दहशत संपुष्टात आली आहे पन या मुळे नक्सलवाद ला चलना मिळाली. ज्या पद्धतीने वन्यप्राण्यांसाठी वनविभाग आहे, त्याच पद्धतीने मानव अधिकारांसाठी मानवाधिकार आयोग आहे.
शेवटी आपणास विनंती आहे की या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करून या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करून पीडित कुटुंबाला न्याय व नुकसान भरपाई द्यावी.