जापान शोतोकान कराटे असोसिएशन-भारत द्वारा बेल्ट ग्रेडिंग टेस्ट चे आयोजन
राजुरा, २ डिसें. : काल जापान शोतोकान कराटे असोसिएशन-भारत द्वारा बेल्ट ग्रेडिंग टेस्ट चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला बेल्ट ग्रेडेशन परीक्षक म्हणून सेन्सई रवी कोपुला ब्लॅक बेल्ट फोर्थ डॉन, प्रशिक्षक बंडू करमनकर ब्लॅक बेल्ट थर्ड डॉन यांनी मुख्य भूमिका पार पडली. जे एस के ए शाखेची स्थापना राजुरा येथे ऑगस्ट महिन्यात करण्यात आली.
सुरुवातीला फक्त २-३ विद्यार्थी होते. मात्र आता पूर्ण नंदनवन फुलले आहे. रवी कोपला व बंडू करमनकर विद्यार्थ्यांवर खूप मेहनत घेतात. त्यांच्या या अथक परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत आपलं कौशल्य दाखवून गोल्ड, ब्रॉन्झ अशी पदके पटकावली आहे.
बेल्ट ग्रेडिंग परिक्षेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र सचिव जे एस के मोहुर्ले, जिल्हा परिषद सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सचिव अविनाश जाधव, शिवाजी कॉलेज राजुरा प्राचार्य संभाजी वारकड, ऍड. अरुण धोटे, प्रा. बी. यु. बोर्डेवार आदी मान्यवर व पालक वर्ग उपस्थित होते.