संगमनेर मध्ये झिमझिम् पावसा सह प्रचंड गारवा.. परिसरात रात्र भर वीज गायब…
अहमदनगर
संगमनेर २/१२/२०२१(प्रतिनिधी ज्ञानेश्वर गायकर पाटील)
वातावरणात अचानक झालेल्या बदला मुळे काल सकाळ पासून संगमनेर व अकोले तालुक्यात झिम झिंम पाऊस सुरू झाला , पावसाबरोबर थंडी ही मोठा प्रमाणात असल्याने ,नागरिकांना उबदार कपडे घालण्याची वेळ आली आहे. पावसाचे प्रमाण अत्यअल्प आहे, मात्र थंडीचा कडका व पारा हा १४ डिग्री पर्यंत खाली आला आहे.नेहमी प्रमाणे विजेने आपली अवकात दाखवून रात्र भर बत्ती गुल झाल्याचे अनेक भागात दिसले.
कुठल्या न कुठल्या समुद्रात कायमच कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन महाराष्ट्रातील जनता एका महिन्यात उन्हाळा, पावसाळा, व हिवाळा हे ३ ही ऋतू अनुभवत आहेत. ऋतुंच्या या लंपडाव मुळे नागरिक हैराण झाले असून , घशाचे आजार ,थंडी ताप आदी आजार बळावत असून कोरोना ची ही भीती वाढली आहे. नागरिकांनी थंड पेये टाळावीत, पाणी कोमट करून पिण्यास वापरावे.कान व अंग पूर्ण झाकून उबदार कपडे वापरावीत , काही दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला तातडीने घेण्यात यावा ,असे मार्गदर्शन डॉक्टर श्री जगदीश वाबळे व डॉक्टर सौ . एकता वाबळे यांनी केले आहे. सध्या बंगाल च्या खाडी कडे हा कमी दाबाचा पट्टा आंध्र व ओरिसा कडून सरकला असल्याने तीन डिसेंबर पर्यंत मद्य महाराष्ट्र , उत्तर कोकण भागात पावसाची तीव्रता अधिक वाढू शकते ,असा अंदाज ही हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिरायती व पठार भागातील ज्वारी , गहू हरभरा आदी पिकांना हा पाऊस वरदान असला तरी कांदा पिकास मात्र हानिकारक आहे. सध्या साखर कारखाने चालू असून ऊस तोडीस ही वत्यय निर्माण होत आहे. आदिवासी भागात भात धानाची काढणी झाली असली तरी मळणी बाकी आहे, भात धानाचे ही मोठे नुकसान होत असल्याचे सखाराम सारोक्ते यांनी सांगितले. अवकाळी या पावसाने शेतकरी, तसेच नागरिक यांचे आरोग्य बिघडवले असून ,संगमनेर अकोले तालुका काल हिमाचल व काश्मीर चे वातावरण अनुभवत होता. शहरातील नागरिकांनी काल बाहेर पडण्याचे टाळले असून गृहिणींनी ही भाजी बाजारात न जाण्याचा निर्णय घेतला असल्याने सगळीकडे शुक शुकाट जाणवत होता. मद्याचे बार व दुकानावर मात्र मोठी गर्दी होती. विजेच्या लपंडाव मुळे संगमनेर कर मात्र त्रस्त आहेत. बिलकुल छोट्या पावसात ही वीज गायब होणे नित्याचे आहे. नागरिक या बाबत संताप व्यक्त करत आहेत.