मनपा च्या निष्क्रीय कामा मुळे जनता त्रस्त
काल दिनांक २८/११/२०२१ रोज रविवार ला विकतु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या पद्धतीने नाली चे अर्धवट काम केल्याने वाहत आलेले संडास बाथरूम चे सांड पाणी हे तेथील नागरिकांच्या घरात जात असून संपूर्ण परिसरात ही घान पसरून आजूबाजूच्या लोकांना रोगराई ने समोर जावे लागत आहे, अशी तक्रार तेथील जनतेनी आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांच्या कडे केली तसेच परिसरातील लोकांनी आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे यांना तक्रार करतांना सांगितले की एकूण ४ लोकांना मागील काही दिवसांत डेंग्यू मुळे रुग्णालयात भरती करावे लागले होते.
वारंवार नगर सेवक यांना तक्रार करून सुध्दा ते या कडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांनी सांगितले. जाणीवपूर्वक नालीचे अर्धवट काम करून जनतेचा जीव धोक्यात टाकण्यात आला आहे ही गंभीर बाब असून संबधित दोषी अधिकारी, ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी तसेच अर्धवट नाली चे बांधकाम तात्काळ पूर्ण करावे, या वरती तात्काळ कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी बाबुपेठ परिसरातील जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरेल असे आप चे शहर सचिव राजु भाऊ कूडे यांनी म्हटले आहे.
यावेळेस आप चे शहर सचिव राजु भाऊ कुडे, बाबाराव खडसे, दीपक निपाणे, सागर बोबडे, सुखदेव दारुंडे, श्रीराम खंडाळे, श्रीमती सुजाता ताई बोदेले, प्रवीण चूनारकर, जयदेव देवगडे,सुमित रायपुरे, चंदू माडूरवार, विशाल रामगिरवार, करण नक्षिने, जयंत थूल, महेश गुप्ता, अंजू रामटेके स्मिता लांडे, छाया इदे, विभा कुळमेथे, इंदिरा आलाम, महेश आलाम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.