थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन…..

0
707

थोर समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन…..

कोरपना, प्रवीण मेश्राम

आज महात्मा फुले चौक गडचांदूर येथे गडचांदूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन,
आज इतकी वर्षे उलटूनही महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेले विचार आणि घेतलेली भूमिका काळाच्या कसोटीवर टिकून आहे. यातच त्यांच्या विचारांची ताकद आणि सामर्थ्य दिसून येते. ज्यांचे विचार काळाच्या कसोटीवर सर्व शक्यतांना आणि दावे प्रतिदावे यांना पूरुन उरतात, तोच खरा विचारवंत. फुले यांचे विचार पाहता लोकांनी त्यांना “महात्मा” ही लोकपदवी का दिली हे ध्यानात येते. ज्योतिबा फुले यांचे कर्म आणि विचार सर्व प्रकारच्या चालीरीती, रुढी, परंपरा, जाती, धर्म यांचे जोखड फेकून देतात. बुरसटलेल्या विचारांची जळमट काढून फेकतात. हे विचार मांडताना त्यांना त्या काळातील संकुचित वृत्तीच्या कर्मठ लोकांनी कमी त्रास दिला असे मुळीच नाही. तरीही संकुचितांचे साखळ दंड तोडण्यास ज्योतिबा यशस्वी झाले. त्यांनी लक्षावधी बहुजनांना दिशा दाखवली. अशा या महान युगप्रर्वतकास विनम्र अभिवादन कार्यक्रमध्ये बोलताना प्रा.डाँ.हेमचंद दुधगवळी सर यांनी खरा शिक्षक दिन या भारतामध्ये जेव्हा साजरा होईल तेव्हाच त्यांना खरी श्रद्धांजली दिली असे होईल.या कार्यक्रमाला उपस्थित गडचांदूर च्या नगराध्यक्षा . सविता टेकाम ,आरोग्य तथा स्वच्छता सभापती राहुल उमरे,नगरसेवक अरविंद मेश्राम, युवक काँग्रेस अध्यक्ष रुपेश चुदरी, सुरेश टेकाम, तुळशीराम महाडोळे,गणेश आदे,दिलीप नागोसे,विनोद बोरूले, राहुल थेरे, महादेव आदे, गणपत शेंडे व बहुजन नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष महाडोळे तर आभार तालुका उपाध्यक्ष अतुल गोरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here