संविधान हा आपल्या देशाचा आत्मा- आदित्य वासनिक
● संविधान दिनानिमित्ताने विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण
● ग्रामदर्शन विद्यालयात कार्यक्रम
चिमूर/तालुका प्रतिनिधी
भारतीय संविधान हे सर्व जगासमोर आदर्श असं संविधान असून देशात समतामुलक समाज,प्रत्येक नागरिकांना समान हक्क प्रदान करणारे संविधान हे आपल्या देशाची आत्मा आहे. या मुळेच सर्वांना समान न्याय व संधी उपलब्ध होते असं प्रतिपादन नेचर फाउंडेशनचे सदस्य, उपसरपंच आदित्य वासनिक यांनी केलं. ते ग्रामदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित संविधान सन्मान दिन कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी नेचर फाउंडेशन नागपूर द्वारे संविधान जागर उपक्रमात राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कार विजेत्यांना प्रदान करण्यात आले.
या वेळी अध्यक्षस्थांनी प्राचार्य सदाशिव मेश्राम, सहायक शिक्षक कोकाडे,दिलीप गिरडे,नेचर फाउंडेशनचे प्रदीप मेश्राम,उमेश गजभिये उपस्थित होते. पुढे बोलताना वासनिक यांनी संविधानाने सर्वाना उपलब्ध करून दिलेल्या संधी,हक्क,अधिकार या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.संविधान जागर या उपक्रमाचे महत्व विषद केलं.
प्राचार्य मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीचा इतिहास व त्यासाठी डा. आंबेडकर यांचे योगदान यांचे महत्व पटवून दिले.
या वेंळी मान्यवरांच्या हस्ते नेचर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले.विद्यालयाला भारतीय संविधानाची प्रत व प्रस्ताविका भेट देण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आली. प्रस्ताविक कु.तन्वी खंडसान,संचालन कु.तन्वी गुर्ले तर आभार गुर्ले या विद्यार्थ्यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.