आत्मा व अंबुजा सिमेंट उप्परवाही यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास प्रशिक्षण
राजुरा, 25 नोव्हे. : आज पाचगाव येथे तालुका कृषी यंत्रणा (आत्मा) कृषी विभाग राजुरा व अंबुजा सिमेंट उप्परवाही (BCI) यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कौशल्य विकास आधारीत कार्यक्रम अंर्तगत फवारणी करतांना घ्यावयाची काळजी, साहित्यांचा योग्य वापर व हाताळणी या विषयावर प्रशिक्षण ठेवण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुने व मार्गदर्शक म्हनुन आत्मा संल्लागार समिती राजुराचे अध्यक्ष तिरुपती इंदुरवार, पंचायत समिती सदस्या सुनंदा डोंगे, देवाडा क्रुषी पर्यवेक्षक रत्नाकर गांदगीवार, डाँ. प्रिया बन्सोड, क्रुषी सहाय्यक वाघमारे, क्रुषी सहाय्यक पाचगावचे रंगन्नाथ खटिंग, ACF, BCI प्रक्षेत्र अधिकारी हेमराज साळवे, रुपेश गेडेकर, गोपाल जंबुलवार उपस्थित होते.
या वेळी उपस्थित शेतकऱ्यांना फवारणी करतांना कोण-कोणती काळजी घ्यायला पाहिजे, फवारणी उपकरने कश्या प्रकारे हाताळायला पाहिजे, विषबाधा झाल्यास काय प्रथमोपचार घ्यायला पाहिजे. या सर्व विषयावर सविस्तर चर्चा व प्रशिक्षण देण्यात आले.