शेवगाव (मांगगुडा) येथिल अंगणवाडी वर कारवाई करा – रुग्णसेवक जिवन तोगरे
जिवती : बाल विकास प्रकल्प कार्यालय जिवती अंतर्गत शेवगाव (मांगगुडा) गावात आहार वाटपात होत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी प्रहार संघटनेचे रूग्णसेवक जिवन तोगरे यांनी केलेल्या तक्रारीत संबंधित शेवगाव (मांगगुडा) येथील अंगणवाडी सेविका यांनी आहार वाटप मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे असा आरोप रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्या कडे तक्रार केली असून तक्रारीच्या अहवाल सादर करुन सहकार्य करावे असे अशा आशावादी तक्रार केली आहे.
महाराष्ट्र शासनाने तालुक्याच्या भागामध्ये गरोदर स्त्री व स्तनदा मातांसाठी आहार योजना सुरू केली. मात्र जिवती तालुक्यात या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून बालविकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका हे संगनमत करून लाभार्थ्यांना आहार वाटप न करता कागदोपत्री आहार वाटप दाखवून दिशाभूल करत असल्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करुन दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी लेखी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती जिवती यांच्या कडे केली आहे.
जिवती तालुक्यातील आहार वाटप योजनेतील घोटाळ्यासंबंधांने यापूर्वी अनेकांनी अनेक वेळा तक्रार केली मात्र वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याचे बोलले जात आहे.