नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला

0
2068

नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला

पोंभुर्णा येथे वाघाच्या हल्यात युवक जखमी

रुपेश मंकिवार

पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी :- कामावर जाऊन परतत असताना रस्त्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने युवकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज ३ वाजता चिंतामणी महाविद्यालय जवळ घडली. राहुल गणपत चव्हाण वय ३० वर्षे असे जखमी चे नाव असुन तो चणकापुर वणी येथील रहिवासी आहे.

त्याला जखमी अवस्थेत प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभुर्णा येथे उपचारासाठी दाखल केले. जखमा जास्त असल्यामुळे पुढिल उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here