दोन वर्षांपासून थांबलेले मूर्ती विमानतळाचे काम लवकरात लवकर सुरू करावे – माजी आमदार अँड. संजय धोटे
मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे केली मागणी
राजुरा तालुक्यातील मूर्ती विमानतळ उभारणी करिता प्रकल्प मंजूर करण्यात आला, प्रकल्पासाठी स्थानिक शेतकरी यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले,या भागामध्ये कोणत्याही प्रकारचा उद्योग नसल्याने तसेच येथील शेतजमीन हलक्या स्वरूपाची असल्याने शेती उत्पादन कमी आहे,तसेच सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे,हा प्रकल्प येथे आल्यामुळे येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे,तसेच शेतीला पण चालना मिळेल यासर्व बाबीची मागणी घेऊन माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वाखाली मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली तसेच शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक जिल्हे या प्रकल्पाला जोडले जाणार असून या भागाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे,प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण सुरू असून काही भाग भूमी अधिग्रहण करण्याकरिता मोजणी पूर्ण झाले असून अधिग्रहण झालेले नाही,त्यामुळे येथील शेतकरी संभ्रमात आहे,प्रकल्पात समाविष्ट होणारे भागात शासकीय योजना जसे विहीर,तार कुंपण इत्यादी शेती प्रकल्पात जात असल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही आहे,तसेच या भागात मूर्ती कोलाम वस्ती असून त्यांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित झाले असून उर्वरित काम तसेच बाकी आहे मनुन त्यांना शासकीय लाभ त्यांना मिळत नाही आहे,हे सर्व कोलाम बांधव सन 2018 पासून लाभापासून वंचीत आहे,सदर विमानतळ प्रकल्पाचे काम सन 2017 – 2018 पासून सुरळीत सुरू झाले होते पण मागील दोन वर्षांपासून हे काम ठप्प पडून आहे,हे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी या भागाचे माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केली आहे,या परिसरातील नागरिकांना या विमानतळ प्रकल्पाबाबत शंका निर्माण होत असून उर्वरित प्रकल्पाचे काम सुरू करावे अशी यावेळी प्रसंगी उपस्थित शिष्टमंडळाद्वारे केली आहे.
यावेळी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या सह जिल्हा परिषद माजी सदस्य अविनाश जाधव, माजी सरपंच किसन मुसळे, तंटामुक्ती अध्यक्ष दादाजी गिरसावळे, रामू कुमरे, मोतीराम कुमरे भीमराव आत्राम, अंबादास आत्राम,मुकीदराव कुमरे आदी उपस्थित होते.