आवारपुर बिबि नांदा ग्रामपंचायतीत जमीन फेरफारचे वेगवेगळे नियम

0
787

आवारपुर बिबि नांदा ग्रामपंचायतीत जमीन फेरफारचे वेगवेगळे नियम

आवाळपुर, नितेश शेंडे : कोरपना पंचायत समिती अंतर्गत लोकसंख्येने मोठ्या व औद्योगिक वसाहत असलेल्या ग्रामपंचायती म्हणून नांदा , बिबी , आवारपुर या गावांची ओळख आहे. या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये जमीन फेरफार संमधाने वेगवेगळे नियम लावण्याचे काम येथील सचिव व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी करीत असल्याने गोरगरीब नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन सर्व ग्रामपंचायतींमध्ये जमीन फेरफार संमधाने सारखेच नियम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील बिबी,आवारपूर या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी असलेले अथवा नसलेले असे दोन्ही दस्ताऐवजावरील जमीनीचे खरेदी विक्री पत्र , बक्षीस पत्र असल्यास मालमत्ता नोंद वहीत एकाच्या नावावरुन दुसर्‍याचे नावे फेरफार घेतली जाते. यासोबतच शेतजमीनीचे तुकडे पाडून शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरील खरेदी खताचे आधारे ग्रामपंचायती मालमत्ता नोंदवहीत नोंद घेऊन नवीन नमुना आठ तयार करून देतात. परंतु नांदा ग्रामपंचायतीत असले नियम चालत नाही. रजिस्टर्ड विक्री बक्षीसपत्र असेल तरच फेरफार घेतली जाते. जमिनीचे फेरफार घेण्याबाबत या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळे नियम असल्याने नांदा येथील अनेक नागरिकांचे फेरफार झाले. नसल्याने विज कनेक्शन, नळ कनेक्शन, गृहकर्ज व इतर शासकीय कामे होत नसल्याने नागरिकांची अनेक वर्षापासुन चांगलीच गैरसोय होत असून वेगवेगळ्या नियमांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी याकडे लक्ष देऊन कोरपना तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सारखेच नियम लावून न्याय देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here