जनता कर्फ्यू लावून तुम्हाला कोरोना थाम्बवता येतो अस वाटत असेल तर खुशाल महीना भर जनता कर्फ्यू लावा!
जयदीप खोब्रागडे, जिल्हा महासचिव, वंचित बहुजन आघाडी, चंद्रपुर यांचे मा. पालकमंत्री, चंद्रपुर
मा.जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांना खुले पत्र
आम्ही मास्क वापरु, सोशल डिस्टनसिंग पाळू. पण कृपया आम्हाला पुन्हा lockdown, जनता कर्फ्यू सारख्या अंधश्रद्धेत लोटू नका.. आम्ही हे मान्य करतो की कोरोना चा प्रभाव वाढला आहे. मात्र अलगिकरनात राहून कोणताही उपचार न होता बरे होणारे पेशंट सुद्धा कमी नाहीत. गरीब लोकांचे जेवनाचे हाल होत आहेत. सर्वसामान्य जनता कोरोना पेक्षा त्यांच्या पोटाच्या प्रश्नामुळे जास्त चिंतेत आहे.. आपन लॉकडावून करता. जनता कर्फ्यू लावता.. मात्र सर्व सामान्य जनतेच् काय?
lockdown व्हाव्हा की होउ नये याची माहिती घेण्यासाठी किवा नागरिकाना विचारण्या साठी कृपया एकदा चंद्रपुर च्या श्री टॉकीज चौक, बंगाली कैंप, ला सकाळी आणि बाबुपेठ, अष्टभुजा,इंदिरा नगर, शाम नगर,नेहरू नगर, भिवापुर इत्यादि ठिकाणी तुम्हाला मिळेल त्या वेळेला भेट द्या, आणि विचारा की जनता कर्फ्यू लावायचा का… तेव्हा त्यांच्या तोडून जे उत्तर मिळेल ते आम्हाला मान्य असेल.. ज्यांच्या पोटाचा प्रश्न मिटला आहे त्यांना बोलवायच आणि त्यांच्या तोडून जनता कर्फ्यू ला मान्यता मिळवून घ्यायची आणि आता 15 दिवस पुन्हा घरीच राहा अस म्हणन आता जमनार नाही.
सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानात तांदूळ आणि गहु मिळतात काय खरच तांदूळ आणि गहु खाऊन मानुस जगु शकतो? त्यासोबत इतरही गोष्टी लागतात त्या मिळवण्या साठी सर्व सामान्य मानुस सकाळ पासून संध्याकाळ पर्यन्त राबतो. ते राबनच जर आपन बंद करणार असाल तर त्याने खायच काय? जर खरोखर तांदुळ आणि गव्हाने भूक भागत असेल तर प्रयोग म्हणून मा. पालकमंत्री आणि मा. जिल्हाधिकारी साहेबानि भूक भागवून दाखवावी. (महिन्या भरच राशन आम्ही मोफत देऊ त्यांना)
3500 कोरोना बाधित मधे 35 लोक दगावले. त्यातील कित्येक लोकांना आधि काही आजार होते.3500 मधून 35 म्हणजे 1% लोकाचा मृत्यु झाला. आता या 1 %जनतेसाठी उर्वरित 99 %जनतेला वेठीस धरने योग्य नाही.
प्रत्येकाला आप आपला जीव महत्वाचा आहे. कुणालाच अस वाटत नाही की आपल्याला रोग व्हाव्हा. प्रत्येक व्यक्ति आप आपली काळजी घेईल आणि कोरोनाच्या विरुद्धच्या लढाईत जिंकेल.. पण त्यासाठी त्यांच्या मनातील भीति काढ़ने गरजेचे आहे.. जमल तर खालील बाबी करा…
1. सर्वात आधी मोबाइल वर असलेली कोरोनाची डायल टोन बंद करा.
2. दवाखान्यात डॉक्टर नर्स यांना हव्या त्या सुविधा पुरवा. म्हणजे ते लोक पेशेंट च्या जवळ जाऊन त्यांचा उपचार करतील.
3. प्रसार माध्यमा मार्फ़त कोरोना बद्दल जी धास्ति पसरविण्यात येत आहे त्याला थांबवा.
4. सर्दी झाली असेल तर सर्दीचा इलाज करा, खोकला असेल तर खोकल्याचा इलाज करण्याचे आदेश डॉक्टर्स ना द्या. त्यांची सर्दी/खोकला/ताप औषोधपचार केल्यावर ठरलेल्या वेळेत बरा होत नसेल तर त्यांची कोरोना चाचणी करा.म्हणजे आपोआप कोरोना चा आकड़ा कमी होईल.
5. वय वर्ष 55 च्या पुढे असलेल्या लोकांना घराबाहेर निघु देऊ नका. त्यांना लागणाऱ्या सुविधा त्यांच्या पर्यन्त मोफत पोहचवा.
जमल तर एवढं करा..
आणि जर तरीही जनता कर्फ्यू लावून तुम्हाला कोरोना थाम्बवाता येतो अस वाटत असेल तर खुशाल महीना भर जनता कर्फ्यू लावा.. मात्र प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या खात्यात 10000 रूपये जमा करा.