दिव्यांग भास्करला मिळाली नवसंजीवनी

0
984

दिव्यांग भास्करला मिळाली नवसंजीवनी

जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यासह अनेकांनी केली मदत

 

चंद्रपूर – महाकाली मंदिराजवळ चंद्रपूर येथे राहणारे भास्कर सातपुते आणि त्यांची पत्नी हे दोघेही अपंग असून आपल्या तीनचाकी सायकलवर अगरबत्ती व धूप विकून आपल्या पोटाची खडगी भरते. दि.१५/११/२०२१ ला पहाटे ५ चा दरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी भास्करची तीनचाकी सायकल जाळून टाकली यामुळे त्यांचावर उपासमारीची पाडी आल्याचे वृत्त दी.१६/११/२०२१ ला प्रकाशित झाले.याचा आधार घेत जलसंपदा विभागात कार्यरत गणेश गेडेकर वरिष्ठ लिपिक हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात .त्यांनी ही बाब आपल्या कार्यालयीन मित्रांना व काही सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितले.त्यांचा शब्दाला मान ठेऊन व सामाजिक आपलुकीचा भावनेतून पुनम जीवतोडे उपविभागीय अभियंता,अखिल चीडे,स्वाती कुळसंगे सहायक अभियंता श्रेणी-२,बाळू अ पार्ट ऑफ लविंग युनिट चे अमित महाजनवार विस्तार,अमृता महाजनवार अधिकारी,मंगेश पाचभाई,अक्षय दहीलकर सामाजिक कार्यकर्ते,सिध्देश्वर दांडीकवार,विलास नांदे कनिष्ठ लिपिक , आशिष रंगारी यांनी पुढाकार घेऊन भास्करची तीनचाकी सायकल दुरुस्तीचा खर्च व घरगुती किराणा व आवश्यक साहित्य भेट देऊन सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिला.या प्रसंगी या दिव्यांग कुटूंबाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाळू चे महाजनवार यांनी सांगितले

जलसंपदा विभाग चंद्रपूर येथील कर्मचारी यांचे कार्य सर्व शासकीय कर्मचारी यांचेसाठी प्रेरणादायी – अमित महाजनवार यांचे प्रतिपादन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here