माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

0
622

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा

एस टी कर्मचाऱ्यांना भेट देऊन केले मागण्यांचे समर्थन

 

अहेरी/गडचिरोली, सुखसागर झाडे
एस टी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाला अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी पाठींबा दर्शविला आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी संघटना यांचेकडून परिवहन मंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे व इतर मागण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरू असून एस टी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आहेत त्याचा शासनाने गंभीर विचार करून मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी करीत माजी आमदार दीपक आत्राम यांनी आंदोलस्थळी भेट देऊन संपाला पाठींबा दर्शविला व आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहू अशी भूमिका घेत संपाला पाठींबा देणारे पत्र दिले.आणि संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केले.

यावेळी माजी सरपंच दिलीप गंजीवार, माजी सरपंच विजय कुसनाके, जुलेख शेख, महेश सडमेक, संदीप बडगे, जितेंद्र राजवैद्य, रमेश गोगुलवार, हेमंत पुल्लीवार, गणेश चांदेकर, आसिफ कुरेशी, सूर्यकांत मोरे, दीपक कोरेत, तुकाराम बोरूळे, सुशील मून व राज्य परिवहन मंडळ अहेरी आगाराचे चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here