अवकाळी पावसामुळे धान पिकाला फटका

0
769

अवकाळी पावसामुळे धान पिकाला फटका

एकरी वीस हजार रुपये देण्याची मागणी

पोंभूर्णा :-अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले धान पीक पाण्यात बुडाल्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांवर आज उपासमारीची पाळी आली आहे. सदर नुकसान झालेल्या धान पिकांचे पंचनामे करून एकरी वीस हजार रूपये नुकसान भरपाई देण्याची मागणी जामखुर्द चे सरपंच तथा भाजपा ओ.बी.सी. सेलचे महामंत्री बंडू बुरांडे यांनी तहसिलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात केले आहे.

मागील दोन दिवसांपासून पोंभूर्णा तालुक्यात अवकाळी पावसाने धान पिकाला झोडपून काढले होते. कापून ठेवलेले धान पाण्यात भिजल्यामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले. शेकडो एकर क्षेत्रातील धान पिक पाण्यात बुडाले आहे. सरकारी स्तरावरुन अद्याप सर्व्हे सुरू करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

पोंभूर्णा तालुक्यातील, चिंतलधाबा,देवाडा खुर्द,जामतुकूम,जामखुर्द,चेक ठाणा,कवठी ,दिघोरी,घोसरी,आंबेधानोरा,उमरी, सातारा तुकूम,घनोटी, डोंगर हळदी, थेरगाव,वेळवा, देवाडा बुद्रुक,जुनगाव आदी गावांत धान पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here