स्पर्धेच्या माध्यमातून क्रिडा विकासाला चालना – दिपक आत्राम
अहेरी/गडचिरोली, सुखसागर झाडे
लगाम बोरी : ग्रामीण भागातील खेळाडूंना संधीची गरज आहे ही संधी स्थानिक पातळीवर होणाऱ्या क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातून उपलब्ध होत असून या माध्यमातून क्रिडा विकासाला चालना मिळते व सर्वांगीण विकासासाठी स्थानिक पातळीवर क्रिडा स्पर्धांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले.
बोरी येथील वर्धराज स्वामी व्हांँलीबाँल क्लबच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी बोरी ग्रामपंचायत चे सरपंच शंकर कोडापे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्या छाया पोरतेट बोरी ग्रामपंचायत चे उपसरपंच पराग ओल्लालवार, ग्रामपंचायत सदस्य महेश सेडमाके माजी सरपंच विजय कुसनाके, मनिष मारटकर, ग्राम कोष समिती अध्यक्ष साईनाथ मडावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेश गड्डमवार जुलेख शेख, रमेश सिडाम, रमेश आलाम, भगवान कुसनाके,राजू गोट्टमवार आदि मान्यवर उपस्थित होते.क्रिडा स्पर्धांच्या माध्यमातून सांघिक भावनेचा विकास होतो खेळाडूंमध्ये जिद्द व चिकाटी हे गुण वाढीस लागतात ग्रामीण भागाच्या विकासामध्ये एकतेची भावना असणे गरजेचे आहे.युवकांमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे, युवकांच्या संघटनशक्तीचा ग्रामविकासाला मोठा हातभार लागतो त्यामुळे दरवर्षी अश्या स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. असे प्रतिपादन माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्री विनोद ओल्लालवार यांनी केले तर आभार मनोज आलाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष प्रेमसागर आत्राम, उपाध्यक्ष मनोज आलाम, सचिव चिंटू आत्राम, सहसचिव जितेंद्र आत्राम व आयोजक नरेश आत्राम यांनी सहकार्य केले. तसेच बोरी येथील नागरिक उपस्थित होते.