आजपासून जैतापूर येथे जाहीर कीर्तन महोत्सव

0
634

आजपासून जैतापूर येथे जाहीर कीर्तन महोत्सव

श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळाचे आयोजन

राजुरा : कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथे मागील पंचेवीस वर्षापासून श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी कार्तिकी एकादशी निमित्त दत्तसंप्रदाय मंडळींचा जणुकाही मेळावाच भरत असतो. येथील बहुतांश नागरिक श्री सद्गुरु नामदेव रोकडे महाराज आजणगाव यांचे अनुयायी आहे, मागील 25 वर्षांपासून सदगुरु नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ भव्य जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे.

दिनांक १५ व १६ नोव्हेंबर दोन दिवसीय चालणाऱ्या महोत्सवात सोमवरला (दि.१५) सद्गुरु मानिक रोकडे महाराज यांच्या हस्ते दत्ता महाराज (कढोली) रामचंद्र गोहोकार महाराज (आवाळपुर) यांच्या उपस्थितीत घटस्थापना करून सायंकाळी हरिपाठ, भारुड व त्यानंतर कीर्तन महोत्सवाला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारला (दि.१६) सकाळी गावात स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण गावातून सद्गुरु नामदेव रोकडे महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा बाहेरगावाहून येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यासह पालखी सोहळा पार पडणार आहे, दुपारी माणिक रोकडे महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन त्यानंतर अशोक साखरकर चंद्रपूर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील श्री गुरुदेव दत्त संप्रदायाचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे करिता कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक भक्तगणांनी घेण्याचे आव्हान श्री गुरूदेव दत्त मंडळ जैतापूर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here