श्री प्रभू रामचंद्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा
नांदाफाटा प्रतिनिधीनितेश शेंडे
नांदाफाटा/कोरपना : महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने प्राप्त पत्रानुसार जमिनीची भूजल पातळी वाढावी त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होणार नाही. या सर्व गोष्टींचा फायदा करून घेण्यासाठी शासनस्तरावर अशा स्तरावर देण्यात आलेल्या निर्देशानुसार प्रभुरामचंद्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नंदा गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर शंभर सिमेंटच्या बेगा वापरून वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली.
त्यामुळे गावातील जनावरांना पिण्याच्या पाण्याची कपडे धुणाऱ्या महिलांना पाण्याची शिवाय आजूबाजूच्या परिसरातील जमिनीची भूजल पातळी वाढवल्याबद्दल विद्यालयाच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वाची जोपासना करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे, शिक्षक रामकृष्ण घुगे, बॅग शकील शेख, प्रमोद वाघाडे, अजय बारसागडे, अरविंद कुसळकर, शिक्षिका भारती अग्रहरी, कुमारी अश्विनी गुंडे, आवारी शिक्षकेतर कर्मचारी भास्कर बोंडे, बाळा नांदेकर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.