एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ऑल इंडिया पँथर सेनेचा जाहीर पाठींबा
आघाडी सरकारच्या तालीबानी व्यवस्थेचा केला निषेध
चंद्रपूर : महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक सरकार आलेत मात्र राज्य परिवहन एस.टी.कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत राहिल्या. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. परंतु गेल्या अनेक दिवसापासून एस.टी.कर्मचारी राज्यव्यापी आंदोलन करुन आपल्या न्यायीक मागण्या मागत आहेत. या एस.टी. कर्मचाऱ्यांची दिवाळी सुद्धा आंदोलनात रस्त्यावर गेली. ही अंत्यत निंदनीय बाब आहे. आता आंदोलन करणारे आंदोलन कर्ते एस.टी कर्मचारी यांना निलंबित करण्यात येत आहे. अनेक कर्मचारी राज्य शासनाच्या जाचाला कंटाळून आपले जिवन संपवित आहेत. हा सर्व प्रकार बाबासाहेबांच्या विचारधारा असलेल्या महाराष्ट्रात घडते आहे. या आघाडी सरकारच्या अशा तालीबानी व्यवस्थेचा ऑल इंडिया पँथर सेना निषेध करीत असून एस.कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात याकरिता त्यांना एस.टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ऑल इंडिया पँथर सेना चंद्रपूर च्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एस.टी. कर्मचारी यांच्या आंदोनाला पाठिंबा देतांना ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार, जिल्हा सल्लागार संताजी डांगे, जिल्हा उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके, जिल्हा मार्गदर्शक भैय्याजी मानकर, जिल्हा युवा पँथर निशाल मेश्राम, सिद्धार्थ शेंडे, आशिष बोरेवार आदी पँथर उपस्थित होते.