खड्डयांनी घेतला महिलेचा बळी
आमदार साहेब लक्ष देणार का? ; संतप्त नागरिकांचा सवाल
राजुरा : राजुरा-रामपूर-कवठाळा मार्गावरील वरोडा गावांसमोर असलेल्या खड्ड्यांमध्ये मोटर सायकल उसळून सकाळी 11 वाजता अल्का भास्कर गोखरे (वय 45) जागेवर मरण पावली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचेे वातावरण निर्माण झाले असून काही काळ या मार्गावरील वाहतूक रोखण्यात आली होती.
भारोसा येथील अल्का गोखरे या आपल्या नातेवाईकांसोबत साखरी येथील मावसबहिणीकडे येत होत्या. वरोडा या गावाजवळ मोठं मोठे खड्डे पडून असल्याने मोटरसाईकल मोटर सायकलवर बसून असलेल्या अल्का गोखरे या मागे उसळून पडल्या असता मागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच 34 एन 1571 या वाहनांने ती महिला जागेवर चिरडल्या गेली यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
राजुरा-रामपूर-कवठाळा या मार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे परंतु सहा महिन्यांपासून या रस्त्याचे बांधकाम मागील सहा महिन्यांपासून थांबले असल्याने रस्त्यावर मोठं मोठे खड्डे असून धुळीचे लोंढे उडत असल्याने मोठ्या वाहनामागे असलेल्या मोटर सायकलस्वारांना दिसत नाही यात अनेकदा अपघात घडले आहे.
या रस्त्याच्या बांधकामसंबंधी गावागावात रस्ता रोको आंदोलन झाले मात्र या आंदोलकांकडे ना संबंधित विभागाचे लक्ष ना लोकप्रतिनीधीचे लक्ष यामुळे सर्वसामान्य जनतच रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. या मार्गावर आणखी किती जीव घेणार मग त्यांनतर रस्ता बांधकाम करणार आहे असा संतप्त सवाल सामान्य नागरिक करीत आहे.
या रस्त्याचे बांधकाम लवकर करण्यासंबंधी या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी या रस्त्याच्या बांधकामकडे लक्ष देत नसल्याचा आरोप परिसरातील नागरीकांनी केला असून रस्ता बांधकाम सुरू न केल्यास आमजनता रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.