विभागीय वन अधिकारीच्या धाडीमुळे क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यासह, फर्निचर कारागिरात रोष?
कोठारी, राज जुनघरे
वन विभागाचे प्रभारी दक्षता विभागीय वन अधिकारी दररोज भरारी पथकाचे कर्मचाऱयांना घेऊन किरकोळ फर्निचर कारागिराचे घरी कोणतेही सर्च वारन्ट नसताना प्रवेश करून शहानिशा न करता सापडून आलेले सागवान लाकडे जप्तीची कारवाई करीत आर्थिक दंड केला जात आहे यामुळे ग्रामीण किरकोळ कारागिरात उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे तर वनसरक्षण करणाऱ्या क्षेत्रीय कर्मचारी सुद्धा या धाड मोहिमेमुळे वैतागले आहेत. विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याला दक्षता वीभागीय वनाधिकारी पदाचा प्रभार नियमबाह्य असल्याची चर्चा वन कर्मचाऱयांत सुरू आहे.
जंगल शेजारील गावातील बर्याच शेतकर्याचे घरी अनेक वर्षांपासून शेती उपयोगी व घर कामाचे सागवान व इतर झाडांची लाकडी सामान असतातच यापैकी बरेच लाकडाचा रीतसर खरेदी परवाना राहत नाही परंतु सध्या मुळात वरिष्ठ लिपिक असलेले व्यक्तीकडे विभागीय वन अधिकारी पदाचा प्रभार दिला आहे आणि प्रभार मिळताच हा अधिकारी चंद्रपूर वनवृतात येणाऱ्या गावातील किरकोळ फर्निचर कारागिराचे घरावर धाडी टाकीत मिरवून घेत आहे या धाडीच्या वेळी कोणतेही सर्च वारन्ट सुद्धा नसते यावेळी या अधिकाऱ्याची भाषा सुद्धा उर्मट असल्याचा आरोप फर्निचर कारागिराकडून केला जात आहे लाकडे जप्तीची कारवाई केल्यानंतरही आगाऊ पैशाची मागणी करीत असल्याचा आरोपही या फर्निचर व्यवसाईकांनी केला आहे.
या धाडसत्रामुळे क्षेत्रीय कर्मचाऱयांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागत असल्याने वनकर्मचारीही चांगलेच वैतागले आहेत विशेष म्हणजे वरिष्ठ लिपिक दर्जाचे कर्मचाऱ्याला विभागीय वन अधिकारी पदाचा प्रभार दिल्याने वन विभागात चर्चेचा विषय बनला आहे ,शिवाय बदली प्रकरणात याच लिपिकाबद्दल तक्रारी सुद्धा झालेले होते प्रभार येताच ठराविक नियतवन क्षेत्रातील गावात धाड टाकीत आहे.
मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची शिकार होत आहे, रेती मुरूम तस्करी सुरू आहे याकडे मात्र या अधिकार्याचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.