अंधारमय गावात युवकांचे प्रकाशमय कार्य
नमस्ते चांदा बहुउद्देशीय संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तहसिलमघील बगलवाई या गावात सोलर लाइट्सच्या सहायाने साजरी झाली दिवाळी
चंद्रपूर : जवळपास दीड- दोन वर्षे आपण सगळेच घरात बंदिस्त होतो. सध्याच्या आटोक्यात आलेल्या परिस्थिमुळे खऱ्या अर्थाने सणासुदीला सुरुवात झाली आहे. तर नमस्ते चांदा बहुउद्देशीय संस्थेच्या युवकांनी यंदाची दिवाळी काही खास पद्धतीने साजरी केली.
काही दिवसांपूर्वी आम्ही 15 ऑगस्ट च्या निमित्ताने गावाला भेट दिली असता तेव्हा आमच्या असे लक्षात आले की देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली असली तरी पण या गावात विज, पिण्याचे पाणी अशा काही मूलभूत सुविधाच उपलब्ध नाही. त्या भेटीत आम्ही गावकऱ्यांच्या समस्या समजून, त्या समस्यांचे निवारण करण्यात मदत करू असे आश्वासन त्यांना दिले होते.
दिवाळी हा सणच मुळात प्रकाशाचा सण. अशा या पावन दिवशी गावातील लोकांना सोलर लाइट ची सुविधा उपलब्ध करून आम्ही नमस्ते चांदा बहुद्देशीय संस्थेच्या युवकांनी दिवाळीसारखा हा प्रकाशमय सण त्यांच्यासोबत साजरा केला व सोबतच फराळाचे वाटपही केले.

ह्या गावाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न. या गावातील नागरिक जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावत आहे तरीदेखील हे गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. ही बाब प्रशासनाच्या पण लक्षात आणून द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत.