जाहीर पाठींबा
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन (संप) सुरू केलेले आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे व महाराष्ट्र महामंडळ कर्मचाऱ्यांना इतर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत वेतन मिळावे या करिता काम बंद आंदोलन पुकारले आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर पाठींबा दिलेला आहे. आंदोलन कर्त्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी खपवून घेण्यात येणार नाही हे ठणकावून सांगितले आहे.
चंद्रपूर मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या च्या वतीने भेट देऊन चर्चा करून आंदोलनाला समर्थन दर्शविले.
यावेळी जिल्हा महासचिव धीरज बांबोडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष बंडूभाऊ ठेंगरे, महानगर महासचिव सतीश खोब्रागडे, महासचिव सुभाषचंद्र ढोलने, महानगर प्रवक्ता रामजी जुनघरे, रमेश ठेंगरे, महानगर आय टी सेल प्रमुख सोनल वाळके, पी. डब्लू मेश्राम, राजू देशकर, नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.