गडचांदूर् ते कोरपना रोड च्या समस्या ने नागरिकांना नाहक त्रास .
गडचांदूरातील मुख्य रस्त्यावर धुळीचे साम्राज्य.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात, शासनप्रशासन मात्र गार झोपेत.
गडचांदूर:-प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूर शहराची शान समजला जाणारा रेल्वे गेट ते बीरसामूंडा चौक पर्यंतचा मुख्य रस्ता सध्या नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.दुरूस्तीच्या नावाखाली या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे.आगोदरच नागरिकांना कोरोनाने हैराण करून सोडले आता रस्ता जीवघेणा बनला आहे.धुळीमुळे श्वसना संबधींच्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली असून याकडे शासनप्रशासनचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे पहायला मिळत आहे.लोकप्रतिनीधी कित्येकदा या रस्त्यावरून ये-जा करतात मात्र त्यांनीही मौनधारण केल्याचे दिसते.”अहो साहेब,अखेर कीतीदिवस भोगायची नरक यातना” असा निर्वाणीचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी सदर रस्त्याचे दुभाज व डांबरीकरण करण्यात आले. मात्र अल्पावधीतच यावर जागोजागी भेगा व खड्डे पडायला सुरुवात झाली होती.करोडोंच्या खर्चाने निर्मित सदर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बोंब त्यावेळी सुरू होती मात्र निव्वळ टक्केवारीच्या नादात संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.तेलंगाणा राज्याला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग गडचांदूर शहरातून जातो.रात्रंदिवस शेकडो लहानमोठ्या वाहनांची वर्दळ याठिकाणी असते. मागील काही महिन्यापासून सदर रस्ता दोन्ही बाजूला खोदून गीट्टी व माती टाकण्यात आली.तेव्हापासून आजतागायत या रस्त्यावरून चालने मोठ्या जिकरीचे ठरत आहे.सैरावैरा पसरलेली गीट्टी आणि वाहनांच्या वाहतुकीमुळे उडणारी धुळ निष्पाप नागरिकांच्या जीवास धोका निर्माण करणारी ठरत आहे.दुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरले जात असून सध्याच्या परिस्थितीत हा रस्ता पूर्वीपेक्षाही खराब झाल्याचे चित्र असून गीट्टी आणि धुळीमुळे बाईक स्वारांसह लगतच्या दुकानदारांना त्रासदायक ठरत आहे.नागरिकांचे जीव व आरोग्य धोक्यात आले असून शहराची शान समजल्या जाणार्या सदर रस्त्याकडे संबंधीत विभागासह लोकप्रतिनिधींनी सुद्धा दुर्लक्ष केल्याचे आरोप होत असून दुर्घटनांची मालिका सुरू होण्या आधिच अर्धवट पडलेल्या या रस्त्याच्या कामाला पूर्ण करून दिलासा द्यावा अशी मागणी वजा विनंती नागरिकांनी केली आहे.