एम.जी.पी. अंतर्गतच्या चामोर्शी तालुक्यात होत असलेल्या कामांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून कंत्राटदारांना काळया यादीत टाका – आमदार डॉ. देवरावजी होळी
गडचिरोली येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक
गडचिरोली, सुखसागर झाडे
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत करण्यात येणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील कामामध्ये गैरव्यवहार होत असून त्या गैरव्यवहाराची चौकशी करून गैरव्यवहार करणाऱ्या कंत्राटदारांवर व दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
यावेळी बैठकीला उप अभियंता भालाधरे यांचेसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण गडचिरोली उपविभाग अंतर्गत कुनघाडा ३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका चामोर्शी ,येनापुर १६ गावे , व १६ गावे कुरुड येथे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु असून जिल्हा सामान्य रुग्णालय, पोलीस संकुल येथेही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कामे सुरू आहेत. परंतु या अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत जनतेच्या तक्रारी आहेत. त्यामुळे त्या तक्रारींचे निवारण होणे आवश्यक आहे. करिता एम.जी.पी. अंतर्गतच्या कामांमध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी कंत्राटदारांना काळया यादीत टाकावे. असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी या आढावा बैठकीत दिले.