वणी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या
माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांची मागणी
यवतमाळ, मनोज नवले
वनी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात सतत झालेल्या पावसामुळे पुनवट शिंदोला मंडळात अतिवृष्टीमुळे शेतातील पिके पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे.
सप्टेंबर महिन्यात दिवस-रात्र झालेल्या पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले.त्याच पद्धतीने लगतच्या दोन मंडळाची नुकसान झालेली आहे. शासनाचे महावेध अंतर्गत अहवाल 2 मंडळातील 0 सीमारेषा मधील एका गावातील दुसऱ्या मंडळात असलेल्या शेतात अतिवृष्टी मंडळ बदलले म्हणून अतिवृष्टी झाली नसल्याचे शासनाने नमूद केले आहे.
तांत्रिक बोट ठेऊन पुणवट -शिंदोला मंडळातील 47 ची कुस्ती लाभापासून वंचित झाले आहे गावातील हजारो शेतकरी अतिवृष्टी लाभापासून वंचित झाले आहे..
या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या अतिवृष्टी चे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या. अशी निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ व आमदार संजीव रेड्डी फक्त तलवार वनी विधानसभा यांना देण्यात आले शेतकऱ्यांची दखल न घेतल्यास आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू विजय पिदुरकर यांचा शासनाला इशारा