शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य अभियान तथा राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत लसीकरण शिबीर
चामोर्शी/गडचिरोली, सुखसागर झाडे
शरदरचंद पवार कला महिला महाविद्यालय चामोर्शी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तालुका आरोग्य विभाग चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी covid-19 लसीकरण शिबिर महाविद्यालयात आयोजित करण्यात आले.
सदर शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले. covid-19 प्रतिबंधात्मक उपक्रमाअंतर्गत लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली.
सदर शिबिर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हुलके तसेच प्रा. आ. केंद्र आमगाव डाॅ.सिरसाम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य टिम आरोग्य सेवक मंदावार,कर्णासे,आरोग्य सेविका दुर्गा शिंदे,जयश्री कुंभारे यांनी लसीकरणाची यशस्वी कामगिरी पार पाडली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. बि.व्हि. धोटे, प्रा. सुखसागर झाडे, प्रा.ललीता वसाके, प्रा.निनांद देठेकर, प्रा. पल्लवी कोटांगले, प्रा. सोनी आभारे उपस्थित होते. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व तालुका आरोग्य विभाग चामोर्शी यांचे सहकार्य लाभले. covid-19 नियमांचे पालन करुन शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.