पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पत्नीने केली आत्महत्या
यवतमाळ, मनोज नवले
कळंब येथील दत्तापूर रोडवरील राखी नगर मधिल रहिवासी आरोपी पती अश्विन अशोक गायकवाड वय २५ वर्ष याचे दुसऱ्या मुलीसोबत अनैतिक संबंध ठेऊन नवविवाहित पत्नी सौ. नंदिनी अश्विन गायकवाड वय २२ वर्ष हीला तु मला आवडत नाही मी तुझ्या सोबत लग्न करून फसलो म्हणून नेहमी शारीरिक, मानसिक त्रास देत असल्याने नवविहीता सौ. नंदिनी हीने दि. २६ आक्टोंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता चे दरम्यान घरातच फाशी घेऊन लटकून घेतले असता तीला यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती केले असता दि. २८ आक्टोंबर रोजी मरण पावली.
प्राप्त माहिती नुसार येथील दत्तापूर रोडवरील राखी नगर मध्ये राहात असलेल्या सुपरिचित असलेल्या अशोक गायकवाड यांचा तीन नंबरचा मुलगा अश्विन अशोक गायकवाड याचे गेल्या वर्षाच्या कडक लाॅकडाऊन मध्ये कळंब तालुक्यातील गांधीनगर येथील कु. नंदिनी अरुण कोल्हे हीचे समाजाच्या रीतीरिवाजांप्रमाणे दि. ६ एप्रिल २०२० मध्ये अश्विन गायकवाड सोबत लग्न झाले. लग्नानंतर पहील्या दिवाळी लाच मृतक माहेरी गेली असता तीने तीचे आईजवळ नवऱ्याचे बाहेरच्या मुलीसोबत अनैतिक संबंध असल्याचे सांगितले. मी त्यांना आवड नाही मी तुझ्या सोबत लग्न करून फसलो सांगुन जावयी नेहमी मानसिक त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतर जावयी अश्विन व मुलगी नंदिनी हे दोघेही सिमला येथे फिरायसाठी जाणार असल्याचे तीने दि. २४ आक्टोंबर २०२१ रोजी तीने आत्याचे घरी मलकापूर येथे गेली असता तेथून मला फोन करून सांगितले. परंतु तीला न नेता जावयी दोन दिवस घरी आलाच नाही त्यामुळे मृतकने त्याला विचारना केली असता मृतक सोबत वाद घालून कळंब येथे परत आले. त्यानंतर दि. २६ आक्टोंबर रोजी मृतक ची आई शेतात मजुरीला गेली असता दुपारी फोन आला नंदिनी ने फाशी घेतली असल्याने तीला यवतमाळ येथील शासकीय दवाखान्यात भरती केले आहे भेटायला या सदर फोन वरुन मृतक ची आई व नातेवाईक दवाखान्यात भेटायला गेले असता मुलगी उपचार घेत होती तीचा दि. २८ आक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता चे दरम्यान मृत्यू झाला. सायंकाळी कळंब येथील उत्तर वाहीनी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार पार पडले व दि. २९ आक्टोंबर २०२१ रोजी मृतक नवविवाहितेची आई श्रीमती उषा अरुण कोल्हे वय ४५ वर्ष रा. गांधीनगर, ता. कळंब हीने कळंब पोलीस स्टेशनला येऊन जबानी रीपोर्ट दिल्याने मृतकचा पती अश्विन अशोक गायकवाड याचेवर कलम ३०६ भादवीचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक करण्यात आली. सदर घटने संदर्भात उप पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धारणे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित राठोड करीत आहे.