अडेगांव देश येथे बौद्ध समाजाच्या वतीने बुद्ध मूर्ती तथा आनंद बुद्ध विहार अनावरण सोहळा
चिमूर तालुक्यातील अडेगांव देश येथे बौद्ध पंच कमेठी व महिला मंडळाच्या वतीने बुद्धमूर्ती अनावरण व बौद्धविहार लोकार्पण दिनांक 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे.या निमित्ताने विविध धार्मिक ,सांस्कृतिक,मार्गदर्शन मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास प्रमुख, मान्यवर प्रा,रवी गुलाब गजभिये आष्टी,कांबळे सर चिमूर,प्रभाकर मेश्राम नागपूर उपस्थित राहणार आहेत.विहाराचे बुद्धमूर्ती अनावरण, पूज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो संघारामगिरी याच्या हस्ते होणार आहे.ज्ञानेश्वर नागदेवते,वकील नितीन रामटके,पोलीस निरीक्षक लता गजभिये भिसी,सरपंच करिष्मा गजभिये,संजय चौधरी उपसरपंच,यांच्यासह अडेगांव बौद्ध मंडळाचे अद्यक्ष सचिव व बौद्ध बांधव,व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा, रविवार दिनांक 31 ऑक्टोबर ला रात्रो ९ वाजता महाराष्ट्र सुप्रसिद्ध गायक व प्रबोधनकार विनोद इंगळे नागपूर यांचा प्रबोधनपर कार्यक्रम,तर 1 तारखेला सकाळी धम्म रॅली,दुपारी 11 वाजता पूज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो संघरामगिरी यांच्या हस्ते बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा,व मार्गदर्शन सायंकाळी 4 वाजता भोजनदान आणि रात्रोला 9 वाजता भीमगितावर नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,तरी परिसरातील जनतेनी या कार्यक्रमात सहभागी घेऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान बौद्ध पंच कमेठी ,रमाई महिला मंडळ,न्यू पंचशील फेडरेशन,अडेगांव देश यांनी केले आहे.