तेलंगणासह महाराष्ट्र सीमेवरील गावात भूकंपाचे सौम्य धक्के

0
1198

तेलंगणासह महाराष्ट्र सीमेवरील गावात भूकंपाचे सौम्य धक्के

 

३१ ऑक्टोबर : तेलंगासह गडचिरोली जिल्हयातील अहेरी उपविभागातील काही गावात आज रोजी ६ : ४८ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. महाराष्ट्रातील अहेरी आणि तेलंगणा मधील बेल्लमपल्ली, आदिलाबाद आदी भाग भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. अहेरी उपविभागातील आष्टी, अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदगाव, बोरी, राजाराम गावात भूकपांचे सौम्य धक्के जाणवले.

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यातील १२ गावात धक्के जाणवले. तालुक्यातील घडोली, गोंडपिपरी शहरातील साई नगरी येथिल अनेकांना धक्के जानवले. कोरपना तालुक्यात आवाळपुर, नांदाफाटा, बिबी परिसरात सुद्धा जाणवले आहेत. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील नागरिक बाहेर आल्याची माहिती देण्यात आली.

हवामान खात्याच्या सेस्मॉलॉजी विभागाने या भूकंपाची पुष्टी केली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा नागपूरपासून २५५ किलोमीटर अंतरावर होता. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, GOI. 77 किमी खोलीसह 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप, वेळ : सायं.6.50 गडचिरोली आणि तेलंगणा सीमेवर जाफ्राबाद चकजवळ (प्राणहिता नदीजवळ). आत्तापर्यंत कोणतीही मानवी किंवा मालाची हानी झाल्याचे वृत्त नाही.
जिल्हाधिकारी, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here